बीडमध्ये बलात्कारानंतर विवाहितेची विष पिऊन आत्महत्या

| Updated on: Feb 26, 2020 | 8:20 AM

परळीमध्ये विवाहित महिलेवर एका नराधमाकडून बलात्कार (Rape on women beed) करण्यात आला आहे.

बीडमध्ये बलात्कारानंतर विवाहितेची विष पिऊन आत्महत्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

बीड : परळीमध्ये विवाहित महिलेवर एका नराधमाकडून बलात्कार (Rape on women beed) करण्यात आला आहे. त्यानंतर पीडित महिलेने आत्महत्या केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना बीडच्या परळी तालुक्यातील गोपाळपूर येथे घडली (Rape on women beed) आहे.

घरात कोणी नसल्याचे पाहून आरोपी माऊली नवघरे याने या महिलेवर बलात्कार केला. घडलेली घटना पीडित विवाहितेने फोनवर आपल्या पतीला सांगितली. परंतु हा अत्याचार सहन न झाल्यानं पती घरी पोहोचेपर्यंत महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली.

या धक्कादायक घटनेनंतर परळी ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने सर्वसामान्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

“मला पत्नीने 11 वाजता फोन केला. माऊली नवघरेने माझ्यावर बलात्कार केला आहे तुम्ही लवकर घरी या, असं पत्नीने सांगितले. मी म्हणालो मी घरी येतोय तू थांब, त्यानंतर ती म्हणाली तुम्ही मुलांना सांभाळा, मी घरी पोहोचलो तोपर्यंत पत्तीने विष पिऊन आत्महत्या केली होती”, असं पीडित महिलेच्या पतीने सांगितले.