Bharat Ratna Award | भारतरत्न जाहीर झाल्यावर अश्रूच सर्व काही सांगून गेले, लालकृष्ण अडवाणी झाले भावूक, मुलगी म्हणाली…

| Updated on: Feb 03, 2024 | 7:11 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केली. लालकृष्ण अडवाणी यांना हा पुरस्कार जाहीर होताच अडवाणी यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

Bharat Ratna Award | भारतरत्न जाहीर झाल्यावर अश्रूच सर्व काही सांगून गेले, लालकृष्ण अडवाणी झाले भावूक, मुलगी म्हणाली...
PM nARENDR MODI AND LK ADVANI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 3 फेब्रुवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली. मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले आहे की, आमच्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक असलेले अडवाणी यांनी भारताच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. तळागाळात काम करून त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली. उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली. अडवाणी यांना भारतरत्न मिळणे हा माझ्यासाठी अतिशय भावनिक क्षण आहे असे पंतप्रधान म्हणाले. मोदी यांच्या या घोषणेनंतर अडवाणी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, भारतरत्न मिळाल्यावर लालकृष्ण अडवाणी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केली. लालकृष्ण अडवाणी यांना हा पुरस्कार जाहीर होताच अडवाणी यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. अडवाणी यांची कन्या प्रतिभा अडवाणी या अडवाणी यांच्यासोबत त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होत्या. त्यांनी लाडू देऊन वडिलांचे अभिनंदन केले.

प्रतिभा अडवाणी यांनी सांगितले की, ‘दादा’ (लालकृष्ण अडवाणी) यांना देशाचा सर्वोच्च सन्मान मिळाल्याने संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. मला माझ्या आईची आज सर्वात जास्त आठवण येत आहे. कारण, त्यांच्या आयुष्यात त्यांचे योगदान मोठे आहे. मग ते वैयक्तिक असो वा राजकीय जीवन. जेव्हा मी आजोबांना सांगितले तेव्हा ते खूप आनंदी झाले आणि म्हणाले की त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या देशाची सेवा करण्यात घालवले. इतका मोठा पुरस्कार देऊन वडिलांचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी आणि देशातील जनतेचे आभार मानले.

माझे वडील या पुरस्काराने खूप भारावून गेले आहेत. ते ‘मोजक्या शब्दांचा माणूस’ आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. राम मंदिर अभिषेकवेळीही ते आनंदी होते. त्यांच्या आयुष्यातील ते एक मोठे स्वप्न होते. त्यासाठी ते खूप दिवस झगडले, काम केले होते. जेव्हा कोणी त्यांची स्तुती करतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात, असेही प्रतिभा अडवाणी यांनी सांगितले.

लालकृष्ण अडवाणी यांचे पुत्र जयंत अडवाणी यांनीही प्रतिक्रिया देताना सार्वजनिक जीवनात माझ्या वडिलांचे योगदान खूप मोठे आहे आणि त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांच्या प्रयत्नांना या अद्भुत मार्गाने ओळखले जात आहे हे पाहणे आश्चर्यकारक आहे असे म्हटले आहे. तर, भावूक झालेले लालकृष्ण अडवाणी यांनी शब्दात प्रतिक्रिया न देता आपले दोन्ही हात जोडून उपस्थित लोकांचे आभार मानले. त्यांचे अश्रूच सर्व काही सांगून जात होते.