तामिळनाडू : भारतात Tik Tok चा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कमी वेळेत Tik Tok एक मनोरंजनाचे माध्यम म्हणून प्रसिद्धीस आले आहे. याच अॅपच्या माध्यमातून तामिळनाडूमधील एका महिलेने तीन वर्षापूर्वी हरवलेल्या पतीचा शोध लावला आहे. Tik Tok अॅपमुळे पतीचा शोध लागल्याने सर्वजण या अॅपचे कौतुक करत आहेत.
महिलेचा पती तीन वर्षापूर्वी भांडण झाल्यामुळे घर सोडून गेला होता. पती घर सोडून गेल्यामुळे पत्नी जयाने त्याचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. यानंतर तीने पोलीस स्टेशनमध्येही पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पण कुठेही तिचा पती सापडत नव्हता.
जयाचा पती एका ट्रॅक्टर कंपनीत मेकॅनिक म्हणून काम करत होता. पती सोडून गेल्यानंतर जयाने काम करत आपल्या दोन मुलांचा सांभाळ केला. पण यामध्ये तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
काहीदिवसांपूर्वी जयाच्या एका नातेवाईकांनी Tik Tok वर एक व्हिडीओ पाहिला ज्यामध्ये सुरेश एका तृतीयपंती महिलेसोबत दिसत आहे. हा व्हिडीओ त्यांनी जयाला दाखवला. पती-पत्नीमध्ये भांडण याच तृतीयपंतीमुळे होत होती. नातेवाईकांनी व्हिडीओ दाखवल्यानंतर जयाने या व्हिडीओबद्दल सर्वत्र चौकशी केली. यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार देत पोलिसांनी इतर तृतीयपंतीयांच्या मदतीने सुरेशला शोधून काढले.