नवी दिल्ली : भारताचे अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांनी यांनी कॉमेडियन कुणाल कामराविरोधात न्यायालयाच्या अवमान प्रकरणी खटला चालवण्यास परवानगी दिलीय. इंटेरिअर डिझाईनर अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला. या निर्णयावर कुणाल कामराने टीका करत काही ट्विट केले होते. हे ट्विट आक्षेपार्ह आणि न्यायालयाचा अवमान करणारे असल्याचं मत वेणूगोपाल यांनी व्यक्त केलं आहे. या ट्विट्सविरोधातच हा खटला चालणार आहे (AG of India K K Venugopal grants consent to initiate criminal contempt against Comedian Kunal Kamra).
अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल म्हणाले, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली निर्लज्जपणे सर्वोच्च न्यायालयाचा आणि न्यायाधीशांचा अपमान करु शकतो असं सध्या लोकांना वाटतंय. पण संविधानात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कायद्याच्या मर्यादा आहेत. सर्वोच्च न्यायालयावरील आणि न्यायाधीशांवरील अन्याय्य आणि निर्लज्ज टीका शिक्षेला कारणीभूत ठरू शकते हा संदेश लोकांना देण्याची वेळ आली आहे, असं मला वाटतं.”
अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांनी आपल्या पत्रात कुणाल कामरा यांच्या काही ट्विट्सचा उल्लेख केला आहे. त्यात कामरा यांनी खूप दिवसांपूर्वीच आदर या शब्दाने सर्वोच्च न्यायालयाची इमारत सोडल्याचं वक्तव्य केल्याचाही उल्लेख केलाय. तसेच सर्वोच्च न्यायालय हा देशाचा सर्वोच्च जोक असल्याची टीका केल्याचंही या पत्रात म्हटलंय.
[Breaking] Attorney General gives consent to initiate criminal contempt against Kunal Kamra @kunalkamra88 for his tweets on Supreme Court in the wake of bail granted to #ArnabGoswami.
The AG gave consent on the letter petition filed by law student @SkandBajpai— Live Law (@LiveLawIndia) November 12, 2020
“सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र आणि तटस्थ नसल्याचा आरोप”
कुणाल कामरा यांनी या व्यतिरिक्त भगव्या रंगातील सर्वोच्च न्यायालय आणि त्यावर सत्ताधारी भाजपचा झेंडा असलेला फोटो पोस्ट केल्याचंही वेणूगोपाल यांनी नमूद केलंय. यावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. ते म्हणाले, “या ट्विटमधून खोचकपणे संपूर्ण सर्वोच्च न्यायालय आणि त्या न्यायालयातील न्यायाधीश हे स्वतंत्र आणि तटस्थ नसल्याचं सांगण्यात आलंय. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय हे भाजपचं न्यायालय असल्याचं आणि भाजपच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप करण्यात आलाय.”
संबंधित बातम्या :
Kunal Kamra | अर्णवच्या सुटकेनंतर खोचक ट्विट, कुणाल कामरावर अवमानना खटला दाखल करण्याची मागणी
उखाड दिया मुलाखत… ‘शटअप या कुणाल’च्या सेटवर रंगला कामरा-राऊतांचा सामना
‘लाच’ देण्यासाठी कुणाल कामरा राज ठाकरेंच्या घराबाहेर उभा
संबंधित व्हिडीओ :
AG of India K K Venugopal grants consent to initiate criminal contempt against Comedian Kunal Kamra