सातारा: ग्रंथालयाचं अनुदान वाढावं यासह विविध मागण्यांसाठी कराडच्या प्रीतिसंगमावर गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरु आहे. मात्र उपोषणाला बसलेल्या महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी असो. चे संस्थापक रवींद्र कामत यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सोडून ते पुन्हा आंदोलनस्थळी दाखल झाल्यानं गोंधळ उडाला. जोपर्यंत अधिवेशनात अनुदानवाढीची घोषणा होत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका कामत यांनी घेतली आहे.
रवींद्र कामत हे गुरूवारपासून उपोषणाला बसले आहेत. दरम्यान ग्रंथालक संचालक सुभाष राठोड यांनी याप्रश्नी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सचिवांसमवेत बैठकीला येण्याचं आवाहन केलं आहे.
28 तारखेला अर्थमंत्र्यासोबत बैठक घेण्यात येईल, आता उपोषण सोडा असं आवाहनही राठोड यांनी केलं. मात्र कामत यांनी ही मागणी धुडकाऊन लावली.