मुंबई : महाराष्ट्रात रब्बी हंगाम सुरु आहे. अनेक ठिकाणी लांबलेल्या पावसाचा शेतीला फटका बसल्याचे दिसते. बाजारात येणाऱ्या मालांचे भाव पडले आहेत. तर, अतिवृष्टीचा सोयाबीन पिकालाही फटका आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक कमी प्रमाणात होत आहे. नागपूरला संत्र्याचे भाव गडगडले आहेत तर नंदुरबारमधील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. हिंगोलीत सोयाबीनची आवक कमी प्रमाणात झालीय. चाळीस गावात कांद्याचे भाव पडले आहेत. (Agriculture news in Maharashtra onion and orange rates down)
नंदुरबारमध्ये पपई उतपादक शेतकरी संकटात
पपई उत्पादनात आघाडीवर असणारा जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपईची लागवड केली जाते. यावर्षी अनेक कारणांनी पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जास्त पावसामुळे वातावरणात आर्द्रता टिकून राहिल्यानं पपईवर विविध विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. पपई पिकाची पानगळ होऊन फळे उघडे पडू लागली आहेत. वातावरणातील उष्णता कायम असल्याने फळे खराब होत आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी आता फळाच्या संरक्षणासाठी गोणपाट आणि पॉलिथिन पेपरचे आच्छादनाद्वारे पपईची फळे झाकण्यास सुरुवात केली आहे. सूर्यप्रकाशापासून फळांचा संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी या उपाययोजना सुरू केल्या आहेत. कृषी विज्ञान केंद्रातील पपई पिकाचे अभ्यास प्राध्यापक कुंडे यांनी पीक संरक्षण आणि फळ संगोपन या संदर्भात मार्गदर्शन केलं आहे. (Agriculture news in Maharashtra onion and orange rates down)
जळगाव जिल्ह्यात कांद्याची अवाक वाढल्याने चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर गडगडले. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चाळीसगाव बाजारात आज नवा कांदा 3 हजार ते 3100 रुपये तर जुना कांदा 16 ते 1800 रुपये क्विंटल जात आहे. नव्या कांद्याची आवक वाढल्याने कांद्याची घसरण झाल्याचं सागितलं जात आहे.
जगप्रसिद्ध नागपुरी संत्र्यांच्या दरात मोठी घसरण
जगप्रसिद्ध नागपुरी संत्र्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. नागपुरातील कळमना ठोक फळबाजारात सध्या संत्र्याचे दर ८ ते १५ रुपये किलोपर्यंत घसरलेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत संत्र्याला सध्या निम्मा दर मिळतोय. दर पडल्याने संत्राउत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. यामुळे संत्राउत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत. किरकोळ बाजारात संत्री महाग आहे. पण, ठोक बाजारात शेतकऱ्यांना अत्यल्प दर मिळतोय. त्यामुळे संत्राउत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढवलंय.(Agriculture news in Maharashtra onion and orange rates down)
हिंगोलीत सोयाबीनला अतिवृष्टीचा फटका
हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीन पिकाचे क्षेत्र 2 लाख हेक्टर एवढे असते.यंदा त्यात 35 हजार हेक्टरची वाढ झाली. मात्र, पीक काढणी सुरू असताना झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. अतिवृष्टीच्या फटक्यामुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली आहे.
गतवर्षी बाजार समितीमध्ये दरोज तीन ते चार हजार पोती आवक होत होती. यावर्षी ही आवक हजार पोत्यांवर येऊन ठेपली आहे. गतवर्षी ऑकटोबर व नोव्हेंबरमध्ये1 लाख 2 हजार क्विंटल सोयाबीन बाजार समितीने खरेदी केले होते. यंदा मात्र या दोन महिन्यात फक्त 56 हजार क्विंटलची खरेदी झालेली आहे. त्यामुळे तब्बल 40 टक्क्यांनी सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली आहे. (Agriculture news in Maharashtra onion and orange rates down)
Video : Aurangabad | कृषी कायदाविरोधात प्रहार संघटनेचे रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन#Aurangabad #bachhukadu #raosahebdanave pic.twitter.com/mYnbN306PT
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 9, 2020
संबंधित बातम्या:
दरवाढीचा भडका! महाराष्ट्रासह देशभरात पेट्रोलचे भाव 90 पार; डिझेलही 80च्या पुढे
भारत बंदमुळे आज भाज्यांचे दर कडाडले, वाचा आजचे ताजे भाव
(Agriculture news in Maharashtra onion and orange rates down)