नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल (Ahmed Patel Passes Away) यांचे बुधवारी (25 नोव्हेंबर) पहाटे 3.30 वाजता निधन झालं आहे. त्यांचे सुपूत्र फैजल पटेल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. पटेल यांच्या निधनाचे वृत्त समजताच काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahu Gandhi) यांनी ट्विटरवरुन पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Ahmed Patel Lived And Breathed Congress, Rahul Gandhi Pays Tribute)
राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “हा एक दु: खद दिवस आहे. अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ होते. पक्षाच्या सर्वात कठीण काळात ते पक्षासोबत उभे होते, त्यांनी काँग्रेस पक्षातच अखेरचा श्वास घेतला. आम्हाला त्यांची खूप आठवण येईल. फैजल, मुमताज आणि पटेल कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत”.
It is a sad day. Shri Ahmed Patel was a pillar of the Congress party. He lived and breathed Congress and stood with the party through its most difficult times. He was a tremendous asset.
We will miss him. My love and condolences to Faisal, Mumtaz & the family. pic.twitter.com/sZaOXOIMEX
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 25, 2020
दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही ट्विटरवरुन अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अहमदजी केवळ अनुभवी सहकारी नव्हते, मी नेहमीच त्यांच्याकडून सल्ले घ्यायचे. ते नेहमीच खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो”.
Ahmed ji was not only a wise and experienced colleague to whom I constantly turned for advice and counsel, he was a friend who stood by us all, steadfast, loyal, and dependable to the end.
His passing away leaves an immense void. May his soul rest in peace.— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 25, 2020
जवळपास महिनाभरापूर्वी अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (corona report positive) आला होता. त्यानंतर त्यांचे आरोग्य अधिकच ढासळले होते. जास्त त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातील आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. त्यांच्या शरीरातील बहुतांश अवयव निकामी झाल्याने बुधवारी पहाटे साडेतीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Senior Congress leader Ahmed Patel passes away)
दरम्यान, अहमद पटेल यांचे सुपूत्र फैजल पटेल यांनी आज पहाटे त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अहमद पटेल यांच्या निधनाबाबत माहिती दिली. फैजल पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आपणास कळवताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आज 25 मे रोजी पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला”. फैजल पटेल यांनी पुढे लिहिले आहे की, “मी आमच्या सर्व शुभचिंतकांना विनंती करतो की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यदर्शनसाठी येताना गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी”.
Senior Congress leader Ahmed Patel passes away, tweets his son Faisal Patel. pic.twitter.com/4QgyLxvPis
— ANI (@ANI) November 24, 2020
कोण होते अहमद पटेल?
अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जायचे. सोनिया गांधींना राजकारणात स्थिरावण्यासाठी पटेल यांनी मोठी मदत केली. गांधी कुटुंबासह काँग्रेसविषयी खडान्-खडा माहिती अहमद पटेल यांना होती. तसंच जेव्हा पक्षहिताचा प्रश्न यायचा, तेव्हा सोनिया गांधी अहमद पटेल यांचा सल्ला अंतिम मानायच्या. एकूणच गांधी कुटुंब आणि काँग्रेसमध्ये अहमद पटेल यांना मानाचं स्थान होतं.
त्यांच्या जाण्याने काँग्रेसची मोठी हानी झालीये. देशभरात काँग्रेसची पिछेहाट होताना त्यांच्या अकाली जाण्याने काँग्रेस नेत्यांना तसंच कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसलाय. ट्विटर, फेसबुकद्वारे नेते, कार्यकर्ते पटेल यांच्याप्रति आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
संबंधित बातम्या
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनाने निधन
(Ahmed Patel Lived And Breathed Congress, Rahul Gandhi Pays Tribute)