अहमदनगर : अहमदनगरमध्ये आतापर्यंत 54 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात (Ahmednagar Corona Positive) आला आहे. सद्यस्थिती जिल्ह्यात एकूण 94 कोरोनाबाधित असून यातील 75 जिल्ह्यातील तर उर्वरित 19 जिल्ह्याबाहेरील आहेत. यातील 54 जण ठणठणीत बरे झाले आहेत. त्यामुळे आता केवळ 40 जणांवर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे यातील 19 व्यक्ती या जिल्ह्याबाहेरील आहे. त्यामुळे मुंबई -पुण्यावरुन अशा बाहेरुन आलेल्या व्यक्तींमुळे जिल्हातील रुग्ण संख्या वाढत आहे.
दरम्यान आतापर्यंत जिल्हा रुग्णालयाने 2065 नमुने तपासले (Ahmednagar Corona Positive) आहेत. त्यापैकी 1922 नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर दहा व्यक्तींचे अहवाल परत पॉझिटिव्ह आले आहेत. .
सध्या जिल्ह्यात संगमनेर, कर्जत तालुक्यातील राशीन, अहमदनगर शहरातील मध्य वस्तीतील काही भाग कन्टेन्मेंट आणि बफर झोन घोषित करण्यात आला आहे. या परिसरात येत्या 04 जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला. या ठिकाणी कोणाला काही अत्यावश्यक असल्यास त्यांच्यासाठी पालिकेने फोन नंबर दिले आहेत.
अहमदनगर कोरोना अपडेट
अहमदनगर जिल्हयात आतापर्यंत 07 जणांचा मृत्यू झाला आहे. यात जामखेड 1, कोपरगाव 1(महिला) संगमनेर 3, पारनेर 1, कर्जत 1, असा एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान सध्या संगमनेर 5, अहमदनगर 9, घाटकोपर 1, पाथर्डी 1, श्रीरामपूर 1, राहुरी 1, सिद्धटेक 1, पारनेर 1, कर्जत 1, नेवासा 1, अकोले 1 अशा 23 जणांवर उपचार सुरु आहेत.
हॉटस्पॉट असलेला भाग
सध्या जिल्ह्यात संगमनेर शहर, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ, कर्जत तालुक्यातील राशीन, नगर शहरातील मध्यवर्ती भाग हॉटस्पॉट जाहीर करण्यात आला आहे. तर श्रीगोंदा तालुक्यातील कारखाना परिसर पूर्णपणे सील करण्यात आले असून हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले आहे.
तर जामखेड , नगर शहरातील मुकुंदनगर, आलमगीर, कोपरगाव, नेवासा हे भाग हॉटस्पॉट शिथिल करण्यात (Ahmednagar Corona Positive) आलेला आहे.
Corona | अलिबागमध्ये एकाच दिवशी 11 कोरोना पॉझिटिव्हhttps://t.co/WAIjwsJF7E#CoronaVirusUpdate #CoronaInMaharashtra #LockdownExtended #CoronaWarriors
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 27, 2020
संबंधित बातम्या :
रायगडमध्ये आणखी 39 कोरोना रुग्ण, जिल्ह्यात बाधितांची संख्या 840 वर
प्रवाशांनी वाढवली विदर्भाची चिंता, मुंबई-पुण्याहून आलेले 100 जण कोरोनाग्रस्त