अहमदनगर : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहेत. पोलिसांनी फरार आरोपी बाळ बोठेच्या घरी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांना काही ठोस पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे अंतरिम जामिनाच्या आशेवर फरार असलेल्या बाळा बोठेच्या अडचणी वाढल्या आहेत. लवकरच आरोपी बाळा बोठेला अटक करण्यात येईल, असा विश्वासही पोलिसांनी व्यक्त केला आहे (Ahmednagar Police raid on house and office of Bala Bothe in Rekha Jare Murder case).
पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले, “रेखा जरे हत्याप्रकरणी आरोपी बाळा बोठेच्या घरावर आणि घरातील कार्यालयावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपी बाळा बोठेच्या घरातून काही ठोस पुरावे मिळाले आहेत. त्यांचा या गुन्ह्याच्या तपासात समावेश करण्यात आला आहे.”
बाळा बोठेची माहिती असल्याचं कळवा, पोलिसांचं नागरिकांना आवाहन
“आरोपीचा शोध घेण्यासाठीही पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक होईल, असा आम्हाला विश्वास आहे. मी नागरिकांनाही आवाहन करतो की आरोपीविषयी कुणाला कोणतीही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याविषयी पूर्ण गोपनीयता पाळली जाईल,” असंही मनोज पाटील यांनी नमूद केलं.
नाट्यमय हत्याकांड
रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या असल्यामुळे रेखा जरे हत्या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. (Eye witness testimony in Ahmednagar Rekha Jare Murder Case)
रेखा जरे कुटुंबियांसह स्वतःच्या गाडीने सोमवारी संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आई असल्याची माहिती होती. त्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी विजयमाला मानेही सोबत असल्याचं समजलं. कारची काच बाईकला लागल्यामुळे जरे मायलेकाशी दुचाकीस्वारांचा वाद झाला. या वादातूनच रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले होते.
अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हा प्रकार घडला होता. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
अहमदनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोन दिवसांच्या आत तीन आरोपींना अटक केली. फिरोज शेख, ज्ञानेश्वर शिंदे आणि आदित्य चोळके या तिघा आरोपींना सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सुरुवातीला ‘रोड रेज’मधून झालेल्या वादातून रेखा जरे यांची हत्या झाल्याचं वाटत होतं, परंतु आरोपींनी सुपारी घेतल्याची कबुली दिल्याने हत्येला वेगळा रंग आला.
संबंधित बातम्या :
रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या हनी ट्रॅपचं ‘मटेरियल’ वाचलंत?
जातेगावच्या घाटात हिरो झालेला बाळा बोठे, जातेगावच्या घाटातच व्हिलन कसा झाला?
रेखा जरे हत्याकांड : प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा जबाब, महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
व्हिडीओ पाहा :
Ahmednagar Police raid on house and office of Bala Bothe in Rekha Jare Murder case