आता भरल्या बॅगा आणि निघालो विमानातून टूरवर असं चालणार नाही. विमानातून प्रवास करताना आता तुम्हाला नवा नियम वाचूनच जावा लागेल. बीसीएएसने हँड बॅगेजच्या नियमात काही बदल केले आहेत. 2 मे 2024 नंतर ज्यांनी तिकीट बुक केले आहेत, त्यांना हे नियम लागू होणार आहेत. विमानतळावर वाढणाऱ्या गर्दीमुळे सुरक्षा तपासणी करताना अडचणी येत असल्याने हे बदल करण्यात आले असल्याचं सांगितलं जात आहे. CISF आणि BCAS ने मिळून हे बदल केले आहेत. या बदलानुसार आता तुम्ही सोबत फक्त एक हँडबॅग घेऊन जाऊ शकता. त्याचं वजन आणि आकारही सीमित असणार आहे. यात काही सवलतील जुन्या तिकीटांसाठीही दिल्या आहेत. तर इंडिगो सारख्या एअरलाइन्सने आपले स्वत:चे नियम बनवले आहेत.
बीसीएएस म्हणजे ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटीने विमानातून प्रवास करणाऱ्यांसाठीच्या हँडबॅगच्या नियमात बदल केले आहेत. एअरपोर्टवर सुरक्षा चौकशी दरम्यान वाढत असलेल्या गर्दीला लक्षात ठेवून केले आहे. एअरपोर्टवर संरक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्सने बीसीएएससोबत मिळून हा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार, आता प्रवासी विमानातून केवळ एकच बॅग घेऊन जाणार आहे. सर्व देशी आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांना हा नियम लागू असणार आहे. तुमच्याकडे आता एकाहून अधिक बॅगा असतील तुम्हाला चेक इन करावं लागणार आहे.
नव्या नियमानुसार, एका हँडबॅगचं वजन फक्त 7 किलो असायला हवं. हा नियम इकोनॉमी आणि प्रीमियम इकोनॉमी क्लासच्या प्रवाशांसाठी आहे. फर्स्ट आणि बिझनेस क्लासचे लोक सुमारे 10 किलोपर्यंतचं वजनाची हँडबॅग सोबत नेऊ शकतात. बॅगेचा आकारही ठरवण्यात आला आहे. बॅगेची उंची 55 सेमी (21.6 इंच), लांबी 40 सेमी (15.7 इंच) आणि रुंदी 20 सेमी (7.8 इंच) हून अधिक असता कामा नये. एकंदरीत बॅगेचं माफ 115 सेमीच्यावर असू नये. जर बॅगेची लांबी, रुंदी, उंची आणि वजन अधिक असेल तर तुम्हाला त्याचे अतिरिक्त पैसे भरावे लागणार आहेत.
जर तुम्ही 2 मे 2024च्या आधी तिकीट बुक केलं असेल तर तुम्हाला सवलत मिळणार आहे. इकोनॉमी क्लासमधील प्रवाशांना 8 किलोपर्यंत बॅग नेता येणार आहे. प्रीमियम इकोनॉमीसाठी 10 किलो आणि फर्स्ट किंवा बिझनेस क्लाससाठी 12 किलो वजनाची सूट देम्यता आली आहे. पण ही सूट केवळ 2 मे 2024 च्या आधी बुक करण्यात आलेल्या तिकीटांना लागू होणार आहे. जर तुम्ही या तारखेनंतर तिकीटात काही बदल केले तर तुम्हाला नवा नियम लागू होणार आहे.
इंडिगो एअरलाइन्सने आपले हँडबॅग नियम सांगितले आहेत. इंडिगोचे प्रवासी एक केबिन बॅग घेऊन जाऊ शकतात. त्याचा आकार 115 सेीहून अधिक नसावा. वजन 7 किलोपर्यंत असावं. याशिवाय एक पर्सनल बॅग म्हणजे लेडिजची बॅग किंवा छोटी लॅपटॉप बॅगही घेऊन जाऊ शकता. पण त्याचं वजन 3 किलोपेक्षा अधिक नसावं. म्हणजे इंडिगोतून दोन बॅगा घेऊन जाण्याची सुविधा देण्यता आली आहे. एक केबिन बॅग आणि दुसरी पर्सनल बॅग.