PHOTO : ऐश्वर्या रायच्या लग्नातील साडीची किंमत 75 लाख, साडीत सोन्याच्या धाग्यांचा वापर
अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन हे दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपं आहे. या दोघांचे लग्न मोठ्या प्रमाणात माध्यमांनी कव्हर केले होते (Aishwarya rai wedding saree).
-
-
अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन हे दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपं आहे. या दोघांचे लग्न मोठ्या प्रमाणात माध्यमांनी कव्हर केले होते. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाची जोरदार चर्चा संपूर्ण देशभरात सुरु होत होती. यावेळी ऐश्वर्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. तिने लग्नात तब्बल 75 लाख रुपयांची साडी नेसली होती.
-
-
ऐश्वर्याने 75 लाख रुपयांची साडी नेसल्यामुळे एखाद्या महाराणीसराखी ती दिसत होती. ऐश्वर्या साऊथ इंडियन असल्यामुळे तिने तिच्या लग्नात साऊथ इंडियन लूक निवडला होता. तिने आपल्या लग्नातील साडी तिचा जुना मित्र भारतातील प्रसिद्ध कॉस्ट्यूम अँड फॅशन डिझायनर नीता लुल्लकडून डिझाईन करुन घेतली होती.
-
-
लग्नात ऐश्वर्या रायसाठी खास कांजीवरम साडी तयार करण्यात आली होती. या साडीवर केलेलं वर्क ऑथेंटिक कांजीवरम साडी तयार करणारे अॅम्ब्रॉईडर्सकडून तयार करुन घेतले होते. या गोल्डन साडीला प्युअर सिल्कमध्ये तयार केले होते. या साडीच्या वीवमध्ये खऱ्या सोन्याच्या धाग्यांचा वापर केला होता. त्यासोबत ब्लाऊज आणि साडीवर दिसणारे क्रिस्टल जगातील सर्वात महागडे क्रिस्टल विकणारी कंपनी क्वारोवस्कीकडून घेतले होते.
-
-
ऐश्वर्याने ट्रू मंगलोरियन नवरीप्रमाणे आपल्या सर्व ज्वेलरी डिझाईन तयार केली होती. यामध्ये ट्रॅडिशनलपासून ते मॉर्डन स्टाईलपर्यंत सर्व प्रकारच्या ज्वेलरी होत्या. या सर्व ज्वेलरीमध्ये 22 कॅरेट गोल्ड तयार केले होते. त्यासोबत यामध्ये हीरे आणि इतर महागड्या दागिन्यांचा वापर केला होता. तसेच केसांमध्येही ऐश्वर्याने फुलासोबत सोन्याच्या पिन्स लावल्या होत्या.