राबडींच्या घरात नागाची ठेचून हत्या, जेडीयू नेत्याचं लालूंवर टीकास्त्र

| Updated on: Nov 07, 2020 | 4:01 PM

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabri Devi) यांच्या पाटण्यातील सरकारी घरात पाच फूट लांबीचा साप आढळून आला.

राबडींच्या घरात नागाची ठेचून हत्या, जेडीयू नेत्याचं लालूंवर टीकास्त्र
Follow us on

पाटणा : बिहारच्या (Bihar) माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabri Devi) यांच्या पाटण्यातील सरकारी घरात पाच फूट लांबीचा साप आढळून आला. काळ्या रंगाच्या सापाला पाहिल्यावर तिथे उपस्थित लोकांची चांगलीच धांदल उडाली. काही वेळात सापाला मारुन टाकण्यात आलं मात्र त्यानंतर आता याचप्रकरणावरुन राजकारणाला सुरुवात झाली आहे. सापाला ठार करण्यावरुन जेडीयू नेते अजय आलोक (Ajay Alok) यांनी लालू-राबडींवर निशाणा साधलाय. (Ajay Alok Slam lalu prasad yadav Over Rabri Devi home Cobra Snake)

राबडी देवींच्या सरकारी निवासस्थानी साप मारल्याची बातमी वाऱ्यासारखी बाहेर पसरली. याच मुद्द्यावरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. “लोक कार्तिक महिन्यात भगवान शंकरांची पूजा करतात. लालू प्रसाद यादव स्वत: शंकरांचे भक्त आहेत. अशा परिस्थितीत भगवान शंकरच्या गळ्यातल्या नाग देवतेला लालूंच्या घरी ठार मारण्यात आले”, अशी तिखट प्रतिक्रिया अजय आलोक यांनी दिली.

पुढे बोलताना अजय आलोक म्हणाले, “भगवान शंकर लालूप्रसाद यादव यांच्या स्वप्नात आले होते आणि म्हणाले की बकरी खाऊ नका, म्हणून त्यांनी बकरी खाणे सोडले. पण आज या घटनेने मन दु: खी झाले आहे. वनविभागाला साप निघाल्याची माहिती दिली असती तर आज नागदेवतेचे प्राण वाचले असते”.

माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या पाटणा येथील सरकारी घराच्या परिसरात काळा साप आढळल्याची घटना आहे. गेल्या काही दिवसांपासून एक काळा साप तिथे आढळत होता. आज जेव्हा सुरक्षा रक्षकांनी साप पाहिला तेव्हा उपस्थितांमध्ये मोठा गोंधळ उडाला. काही वेळात सुरक्षा रक्षकांनी सापाला चारही बाजूंनी घेरुन ठार केलं.

संबंधित बातम्या

बिहारमध्ये आज शेवटची लढाई; मतदानाला सुरुवात; नवा रेकॉर्ड बनवण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन

बिहारमध्ये गंगा नदीत मोठी दुर्घटना, 100 प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, अनेक जण बेपत्ता