मुंबई : महाराष्ट्रातील पहिले दोन कोरोनाबाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातील दोन जण गुढीपाडव्याला ‘कोरोना’मुक्त होऊन घरी परतले आहेत. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे (Ajit Pawar congratulate on Doctors curing corona patient). होळीला कोरोनाबाधित ठरलेले हे दोघे आज गुढीपाडव्याला कोरोनामुक्त झाल्याचे सांगून या रुग्णांवर आणि राज्यातील विविध रुग्णालयात ‘कोरोना’बाधितांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभारही मानले आहेत.
अजित पवार म्हणाले, “राज्यात संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्याची कुठलीही टंचाई नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सरकार सर्वकाळ नियमित राहिल. नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये. नागरिकांनी खरेदी करताना सुरक्षित अंतराची मर्यादा स्वत:हून पाळावी.”
अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतीलच, परंतु जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 5 ने झालेली वाढ आणि राज्यातील रुग्णांची संख्या 112 वर पोहचणं गंभीर आहे. नागरिकांनी आता स्वयंशिस्त आणि संयम पाळून घरातच थांबावं, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केलं. अमेरिकेनं ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी लष्कराची मदत घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेनं अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पडणं टाळावं, असंही आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं .
अजित पवार यांच्या आवाहनातील प्रमुख मुद्दे
संबंधित बातम्या :
80 कोटी लोकांना 2 रुपयात गहू आणि 3 रुपयात तांदूळ मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Corona | भारतात फक्त 27 टक्के नागरिक घरात लॉकडाऊन, सर्व्हेत धक्कादायक माहिती
देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन, सर्व रेल्वे गाड्याही 14 एप्रिलपर्यंत रद्द
Ajit Pawar congratulate on Doctors curing corona patient