मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील निवासस्थानी अत्यंत साधेपणाने गुढी उभारुन गुढीपाडवा साजरा केला. पुत्र पार्थ पवार यांच्या सोबतीने अजित पवारांनी गुढीची पूजा केली. (Ajit Pawar Gudhipadawa Celebration)
राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना, यंदाचा गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करावा. रस्त्यावर उतरु नका, गर्दी टाळा! ‘कोरोना’विरोधात जनजागृती करण्याची, ‘कोरोना’ला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा, असं आवाहन अजित पवारांनी केलं.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक ‘गुढीपाडवा’ या मंगलमय दिनाच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! यंदाचा गुढीपाडवा घरात थांबूनच साजरा करावा. रस्त्यावर उतरू नये, गर्दी टाळा! ‘कोरोना’विरोधात जनजागृती करण्याची, ‘कोरोना’ला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा, असं आवाहन करतो. pic.twitter.com/tbWCiPDscR
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 25, 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या देशभर ‘21 दिवस लॉकडाऊन’च्या घोषणेचं पालन करुन नागरिकांनी घरीच थांबावं! कोरोनाच्या संसर्गाला बळी पडू नये! संसर्ग कुटुंबियांपर्यंत नेऊ नये, असं आवाहन करत सरकार प्रत्येक संकटात जनतेसोबत असल्याही ग्वाही अजित पवारांनी दिली होती. (Ajit Pawar Gudhipadawa Celebration)
‘महाराष्ट्रातील लोक आज गुढीपाडवा साजरा करत आहेत. मी त्यांना यश, आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देतो. या वर्षी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.’ असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
महाराष्ट्रातील लोक आज गुढी पाडवा साजरा करत आहेत. मी त्यांना यश, आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देतो.
या वर्षी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
— Narendra Modi (@narendramodi) March 25, 2020
नरेंद्र मोदी यांनी विविध धर्मीय जनतेला गुढीपाडव्यासोबतच उगाडी, नवरेह, साजीबू चैराओबा या नववर्ष उत्सवाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.
We are celebrating various festivals across India and also the start of a New Year as per our traditional calendar.
Greetings on Ugadi, Gudi Padava, Navreh and Sajibu Cheiraoba.
May these auspicious occasions bring good health, happiness and prosperity in our lives.
— Narendra Modi (@narendramodi) March 25, 2020
गृहमंत्री अमित शाह यांनीही मराठी भाषेत ट्वीट करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
कोरोना- मुक्तीची गुढी उभारूया…
नवीन वर्ष २१ दिवस घरी थांबून साजरे करूया…
तुम्हां सर्वांना गुढी पाडवा आणि नव वर्षाच्या शुभेच्छा…
आपणांस व आपल्या परिवारास हे नवीन वर्ष आनंदाचे, भरभराटीचे आणि उत्तम आरोग्याचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…घरी राहू…सुरक्षित राहू…
— Amit Shah (@AmitShah) March 25, 2020
(Ajit Pawar Gudhipadawa Celebration)