पुणे : पुण्यात कोरोना बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत चाचली (Ajit Pawar On Corona) आहे. पुण्यातील कोरोना मृत्यूदर हा इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. पुण्यातील मृत्यूदर पाहता आता शासनानेही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील मृत्यूदर कमी करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिका आणि रुग्णालयांना (Ajit Pawar On Corona) केल्या आहेत.
“तुम्हाला काय हवं ते घ्या, मात्र पुण्यातील मृत्यूदर कमी झाला पाहिजे“, अशा सूचना अजित पवार यांनी केल्या आहेत. तसेच, ससून रुग्णालय आणि महापालिका यांनी एकत्र येऊन काम करण्याच्या सूचनाही अजित पवारांनी केल्या.
Corona : धक्कादायक! पुण्याचा कोरोना मृत्यूदर देशात सर्वाधिकhttps://t.co/cUdwlg9JvF#PuneFightsCovid19 #CoronaInMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 11, 2020
शिवाय, पुण्यात आता लॉकडाऊनची आणखी कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश (Ajit Pawar On Corona) अजित पवारांनी दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल अजित पवारांनी पुण्यात आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अजित पवारांनी पुण्यातील कोरोनाचा वाढता विखळा रोखण्यासाठी हवी ती पावलं उचलण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासोबत अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुण्यात कोरोनाचं थैमान, आकडा 500 पार
राज्यातील मुंबईनंतर सर्वाधिक कोरोना विषाणूचा संसर्ग हा पुण्यात झालेला (Pune Corona Positive Patient) पाहायला मिळत आहे. पुण्यात काल दिवसभरात 9 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 589 वर पोहोचली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरात पाहायला मिळत आहे. तर पुण्यात काल एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान पुण्यात आतापर्यंत 49 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. यात सर्वाधिक 40 मृत्यू हे ससून रुग्णालयात झाले आहेत. तसेच या मृतांमध्ये पुणे शहरात 47, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील एका रुग्णाचा समावेश आहे.
Ajit Pawar On Corona
संबंधित बातम्या :
पुण्याला कोरोनाचा विळखा, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 589 वर
पुण्यात ‘लॉकडाऊन जोडप्यां’मध्ये कौटुंबिक हिंसाचार वाढला, नवरोबांना ‘क्वारंटाईन’चा इशारा
पुणे पोलिसांचं मिशन ‘ऑल आऊट’, मॉर्निंग वॉकच्या नावाखाली फिरणाऱ्या ‘मच्छरां’वर कारवाई
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बदली अन्यायकारक, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा संताप