अकोला : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत (Akola Corona Positive Patient Suicide) आहे. तसेच कोरोनाबळींची संख्या वाढली आहे. अकोल्यात एका 30 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाने आत्महत्या केली. आज (11 एप्रिल) सकाळी गळ्यावर ब्लेडने वार करत आत्महत्या केली. या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Akola Corona Positive Patient Suicide) आहे. अकोल्यातील रुग्णालयात एका रुग्णालयात आयसोलेशन कक्षात उपचार सुरु होते. त्यावेळी या रुग्णाने गळ्यावर ब्लेडचे वार केले. हा रुग्ण आसामच्या नागाव जिल्ह्यातील सालपड्यातील रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा रुग्ण अकोल्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोना संसर्गित रुग्ण म्हणून 7 एप्रिल रोजी दाखल झाला होता. या रुग्णाचा अहवाल शुक्रवारी 10 एप्रिल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. मात्र शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास गळा कापलेल्या अवस्थेत बाथरुममध्ये रक्तबंबाळ स्थितीत आढळून आला.
या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर उपचार सुरु केले. मात्र शस्त्रक्रिया सुरु असताना त्याचा मृत्यू झाला, असे अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला यांनी सांगितले.
अकोला जिल्ह्यातून 187 लोकांचे नमुने पाठविण्यात आले होते. त्यातील 137 लोकांचे नमुने प्राप्त झाले. यात 124 अहवाल निगेटिव्ह असून 13 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी (Akola Corona Positive Patient Suicide) दिली.