अकोला : अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात तणावाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर अकोला शहरात 17 ते 21 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. ही संचारबंदी संध्याकाळचे 7 तर सकाळी 6 वाजतापर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळं संध्याकाळी 7 वाजतानंतर घराबाहेर पडल्यास पोलिस तैनात आहेत.
अकोला शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही संचारबंदी लावण्यात आली. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ही लावण्यात आला. मात्र अजूनही नागरिक या संचारबंदीला गांभीर्यानं घेताना दिसत नाहीत. त्यामुळं घराबाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे.
त्रिपुरातील घटनेचे पडसाद राज्यात उमटले. अमरावती, मालेगाव, नांदेडमध्ये हिंसाचार झाला. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातही दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यामुळं अकोटमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. ही संचारबंदी 21 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे.
अकोट शहरातील एका भागात 12 नोव्हेंबरला दगडफेकीची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर प्रशासनाने 13 व 14 नोव्हेंबर अशी 24 तासांची संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर पुन्हा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने 14 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू केली होती. दरम्यान, आता ही संचारबंदी 21 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. शहरातील इंटरनेट सेवा 21 नोव्हेंबरपर्यंत बंदच राहणार आहे. त्यामुळं नेटकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
मेडिकल ही अत्यावश्यक सेवेत येते. त्यामुळं रुग्णालयं सुरू आहेत. रुग्णांना रुग्णालयात जाता येते. परंतु, विनाकारण कुणी फिरताना आढळल्यास पोलीस चांगलेच बदडतात. अकोल्याशिवाय वाशीम, बुलढाणा येथूनही अधिकची पोलीस कुमुक बोलावण्यात आली आहे.
इतर बातम्या