लातूर : सतत दारु पिऊन घरात भांडणं करणाऱ्या वडिलांना मुलीने रोखले. त्यामुळे रागाच्या भरात वडिलांनी मुलीला रॉकेल टाकून (alcoholic father set on fire to daughter) पेटवले. पेटवल्याची धक्कादायक घटना लातूर येथे घडली आहे. या घटनेत मुलीचा चेहरा आणि केस जळाले असून ती 15 टक्के भाजली आहे. मुलीवर सध्या लातुरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी वडील फरार असून पोलीस त्याचा शोध (alcoholic father set on fire to daughter) घेत आहेत.
विशेष म्हणजे ही घटना 6 फेब्रुवारीला घडल्यावर पीडित मुलीने आपण स्टोव्हच्या भडक्याने जळाले असल्याचे पोलिसांना सांगितले होते. पण पोलिसांनी अधिक तपास केला असता यामध्ये वडिलांनी मुलीला रॉकेल टाकून जाळले असल्याचे समोर आलं आहे.
लातूर पोलिसांनी आरोपी वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, नुकतेच हिंगणघाट येथे एका शिक्षिकेला जिवंत जाळण्यात आले. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचा निषेध करण्यात आला. त्यानंतर आता लासलगावमध्येही एका विधवेला जिंवत जाळण्यात आल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.