अंथरुणाला खिळलेल्या अमर सिंहांची मृत्यूशी झुंज, अमिताभ बच्चन यांची जाहीर माफी!

| Updated on: Feb 18, 2020 | 8:22 PM

राज्यसभा खासदार अमर सिंह यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची जाहीर माफी (Amar singh apologies to Amitabh Bachhan) मागितली आहे.

अंथरुणाला खिळलेल्या अमर सिंहांची मृत्यूशी झुंज, अमिताभ बच्चन यांची जाहीर माफी!
Follow us on

मुंबई : राज्यसभा खासदार अमर सिंह यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची जाहीर माफी (Amar singh apologies to Amitabh Bachhan) मागितली आहे. सोशल मीडियावरुन त्यांनी बच्चन कुटुंबियांची माफी मागितली. आज अमर सिंह यांच्या वडिलांचे श्राद्ध होते. त्या निमित्ताने बच्चन यांनी अमर सिंह यांना मेसेज केला होता. यावर अमर सिंह भावूक झाले. त्यांनीही तातडीने बच्चन यांना मेसेज केला आणि माफी (Amar singh apologies to Amitabh Bachhan) मागितली.

राज्यसभा खासदार अमर सिंह आणि अमिताभ बच्चन हे एकेकाळी खास मित्र होते. पण कालांतराने या दोघांच्या मैत्रीत वाद निर्माण झाले. त्यांच्या मैत्रीत वाद निर्माण झाल्याने अमर सिंह यांनी सार्वजनिक कार्यक्रमात अमिताभ आणि त्यांच्या कुटुंबियांवर नाराजी दर्शवली होती. पण आज वडिलांच्या श्राद्ध निमित्ताने बच्चन यांच्या मेसेज आल्याने अमर सिंह यांनी बच्चन यांची माफी मागितली.

“आज माझ्या विडलांचे वर्षश्राद्ध आहे, मला अमिताभ बच्चन यांच्याकडून मेसेज आला. आयुष्याच्या प्रवासात सध्या मी जीवन आणि मृत्यूच्या दारात उभा आहे. मी अमिताभ आणि त्यांच्या परिवाराची माफी मागतो. मी केलेल्या काही वादग्रस्त प्रतिक्रियासांठी त्यांची माफी मागतो. तुमच्या सर्वांवर देवाची कृपा असावी”, असं ट्वीट अमर सिंह यांनी केले.

अमर सिंह सध्या सिंगापूरच्या एक रुग्णालयात उपचार घेत आहेत. अमर सिंह यांनी अमिताभ यांची पत्नी जया बच्चन यांना समाजवादी पक्ष सोडण्यास सांगितले होते. पण त्या तयार नव्हत्या. 2010 मध्ये अमर सिंह यांनी समाजवादी पक्षातून बंडखोरी केली होती. तेव्हा बच्चन कुटुंबीय त्यांच्यासोबत नव्हते. त्यामुळे अमर सिंह नाराज झाले होते.