मुंबई : अॅमेझॉन प्राईमची लोकप्रिय वेब सीरीज ‘मिर्झापूर’चे तिसरे पर्व अर्थात ‘मिर्झापूर 3’ (Mirzapur season 3) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मिर्झापूर’ वेब सीरीजचे दुसरे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पहिल्या पर्वाप्रमाणेच दुसऱ्या पर्वालाही चाहत्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. आता दुसऱ्या पर्वाच्या यशानंतर अॅमेझॉन प्राईम तिसर्या पर्वाची घोषणा केली आहे (Amazon Prime Video Announces Mirzapur season 3).
या वेब सीरीजच्या तिसऱ्या पर्वातून रसिकांना पुन्हा एकदा भौकाल अनुभवता येणार आहे. अली फजल, पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदु शर्मा तिसर्या पर्वात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. दुसऱ्या भागात अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे ‘मिर्झापूर 3’मधून मिळणार आहेत.
‘मिर्झापूर 2’ प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात त्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. बहुतेक लोकांनी ‘मिर्झापूर 2’ पहिल्याच दिवशी पूर्ण पाहिला आहे. आतापर्यंतच्या एकूण दर्शकांपैकी अर्ध्या प्रेक्षकांनी केवळ 48 तासांत ही वेब सीरीज बघून पूर्ण केली आहे. मिर्झापूर 2 मध्ये श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, हर्षिता गौर, अंजुम शर्मा, शीबा चड्ढा यांच्यासह अनेकजण महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले होते. ‘मिर्झापूर 2’ 23 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला होता (Amazon Prime Video Announces Mirzapur season 3).
एक्सेल एन्टरटेन्मेंट आणि ‘मिर्झापूर’चे निर्माते रितेश सिधवानी याबद्दल सांगताना म्हणाले की, ‘मिर्झापूरची दोन्ही पर्व जगभरात गाजली आहेत. अॅमेझॉन प्राईम सारख्या मोठ्या मंचाच्या सहकार्यामुळे हे सगळे शक्य झाले आहे. दोन पर्वांनंतर आता आम्ही तिसर्या पर्वावर काम करत आहोत. ‘मिर्झापूर 3’बद्दल सोशल मीडियावर चाहत्यांचे प्रेम आणि प्रतिक्रिया पाहिल्या आहेत. त्यांच्या या प्रतिसादामुळे आम्ही खूप खुश आहोत.’
Intezaar ki acchi baat hai, ki kabhi bhi khatam ho sakta hai. We are happy to put an end to this wait. Let the fun begin.. again #Mirzapur2 https://t.co/nkX9VSBBoT pic.twitter.com/RrXN9m0JgA
— Ritesh Sidhwani (@ritesh_sid) October 23, 2020
‘मिर्झापूर 2’मध्ये प्रत्येकजण मिर्झापूरच्या गादीवर बसण्यासाठी खटाटोप करताना दिसला. याशिवाय ‘मिर्झापूर 2’च्या शेवटी मुन्ना भैयाची हत्या झाल्याचे दाखवले गेले होते. तर, कालीन भैयाचा जीव वाचवण्यासाठी शरद त्याला घेऊन पळून जातो. आता तिसर्या पर्वात कालीन भैया पुन्हा अवतरणार आहे. त्यानंतर काय हंगामा होणार आणि अखेर ‘मिर्झापूर’ कोणाला मिळणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिसऱ्या पर्वात अर्थात ‘मिर्झापूर 3’मध्ये मिळणार असल्याचे कळते आहे.
(Amazon Prime Video Announces Mirzapur season 3)