ताईपेई (तैवान) : भारताच्या सीमेवर कुरापती करणाऱ्या चीनच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या संरक्षण दलाने चीनवर आपली नजर रोखली आहे. नुकतेच अमेरिकेचे यूएस बी वन बी (US B-1B) बॉम्बर युद्ध विमानं रविवारी (16 ऑगस्ट) चीन प्रजासत्ताक असलेल्या तैवानवर फिरताना दिसले आहेत (American bomber aircraft seen over taiwan). तैवान माध्यमांनी याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार सोमवारी चीनच्या संरक्षण तज्ज्ञांनी अमेरिका संभाव्य युद्ध क्षेत्रात चीनच्या सैन्याची गुप्त माहिती गोळा करत आहेत. सध्या अमेरिकेने याबाबतच्या प्रयत्नांना गती दिली आहे.
चीनच्या संरक्षण तज्ज्ञांनी चीनने संभाव्य युद्धासाठी तयार रहायला हवं असं मत व्यक्त केलंय. पूर्व आणि दक्षिण चिनी महासागरात अमेरिकेच्या युद्ध विमानांच्या उपस्थितीने अनिश्चितता आणि धोका वाढवला आहे, असं मत चीनच्या माध्यमांमधून व्यक्त केलंय जातंय. अमेरिकेचे युद्ध विमान दिसल्यानंतर तैवानच्या लिबरटी टाईम्सने सोमवारी सांगितलं, “अमेरिकी बॉम्बर विमानाने रविवारी गुआम येथील अंडरसन एअरफोर्स बेसपासून पूर्व चीन महासागर एअर डिफेंस आयडेन्टिफिकेशन झोनच्या (ADIZ) दक्षिण भागात उड्डान केलं. हा भाग तैवानच्या पूर्वोत्तर हद्दीत येतो.
अमेरिकेचं चीनला आव्हान, तैवानच्या माध्यमांचा दावा
अमेरिकेच्या या कृतीने थेट चीनला आव्हान दिलं आहे, असं मत तैवान माध्यमांनी व्यक्त केलंय. असं असलं तरी चीनच्या आर्म्स कंट्रोल अँड डिसआर्मामेंट असोसिएशनचे तज्ज्ञ याला फार मोठं आव्हान मानत नाहीत. चिनी माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार चीनच्या संरक्षण तज्ज्ञांनी म्हटलं आहे, “अमेरिकेने मागील 2 वर्षांमध्ये 1,000 पेक्षा अधिक वेळा आपल्या बॉम्बर आणि इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स एअरक्राफ्टला ( ADIZ) दक्षिण चीन महासागराजवळ पाठवलं आहे. आता या भागात तणाव तयार व्हावा असं अमेरिकेला वाटत आहे. मात्र, हे फार मोठं आव्हान नाही.”
“अमेरिकेने चीनच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केलेला नाही. त्यामुळे आम्हाला अमेरिकेचं विमान पाडण्याची गरज पडली नाही. अमेरिकेने पाठवलेले सर्वाधिक युद्ध विमानं हे टेहाळणी करणारे आहेत. त्यामुळे त्यात हत्यारं नाहीत. त्यामुळे अमेरिका देखील संयमिपणे हे करत आहे आणि चीनसोबत संघर्ष टाळत आहे,” असं मत चिनी संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
संबंधित बातम्या :
कोण किती पाण्यात?, कोणत्या देशाचं नौदल तुफानी ताकदीचं?
चिनी सैनिकांनी पाकिस्तानच्या जवानांना धुतलं, जोरदार हाणामारी
चीन-अमेरिकेतली तणातणी वाढली, अमेरिकेचे 24 तासात दोन निर्णय, चीनच्या चिंतेत वाढ
American bomber aircraft seen over taiwan