नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीच्या वितरणाबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना कोरोनासंबंधी तीन मुद्यांवर काम करण्यास सांगितले आहे. सर्व राज्यांमध्ये कोरोना मृत्यूदर एक टक्क्याहून कमी ठेवणे, नव्यानं वाढणारी कोरोना रुग्णसंख्या 5 टक्क्यांहून अधिक वाढू नये आणि कंटेनमेंट झोनमधील कार्यवाही वेगवान करावे, या तीन मुद्यांवर काम करावे, असं अमित शाहांनी सर्व मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. (Amit Shah sets three point target for all states chief minister for control corona)
अमित शाह यांनी अधिकाऱ्यांनी प्रत्येक आठवड्याला रेड झोनमध्ये दौरा केला पाहिजे, असे सांगितले. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी तीन मुद्यांवर काम करुन लक्ष्य प्राप्त करावे, असं अमित शाह म्हणाले.
दररोज 10 लाख तपासण्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची अशावेळी होत आहे. ज्यावेळी भारतातील कोरोना रुग्णसंख्या 90 लाखांहून अधिक आहे. देशात दररोज 10 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या होत आहेत. देशात आतापर्यंत 13.36 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात 24 तासात 40 हजारांहून कमी रुग्णसंख्या आढळली आहे. भारतात 8 नोव्हेंबरनंतर 50 हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात एकूण कोरोना संसर्गाचे प्रमाण 6.87 टक्के आहे. तर, दररोजच्या कोरोना संक्रमणाचा दर 3.45 इतका झाला आहे. कोरोना चाचण्या वाढवल्यामुळे कोरोना संक्रमणाचा दर कमी झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात सध्या 4 लाख 38 हजार 667 कोरोना रुग्ण आहेत. देशातील 86 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महाराष्ट्रात सोमवारी 4153 कोरोना रुग्ण
देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात सोमवारी 4153 कोरोना रुग्ण आढळले. तर, नवी दिल्लीमध्ये 4454 कोरोना रुग् आढळले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
“कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. महाराष्ट्रात लसीकरण कशा रितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे”, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले.
दरम्यान, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. दिवाळीनंतर या राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. तसेच मृतांचा आकडाही वाढत आहे.
महत्वाच्या घडामोडी LIVE https://t.co/ulmEizGghX
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 24, 2020
संबंधित बातम्या:
कोरोना लशीच्या वितरणासाठी आतापासूनच तयारीला लागा; पंतप्रधान मोदींचे राज्यांना आदेश
(Amit Shah sets three point target for all states chief minister for control corona)