Amol Kolhe | महाराष्ट्रात जरा काय घडलं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे कुठे आहेत, अमोल कोल्हेंचा सवाल

| Updated on: Oct 02, 2020 | 9:13 PM

महाराष्ट्रात जरा काय घडलं की राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणारे या घटनांच्या वेळी कुठे जातात, असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. (Amol Kolhe ask questions silence of opposition party leaders on hathras case )

Amol Kolhe | महाराष्ट्रात जरा काय घडलं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे कुठे आहेत, अमोल कोल्हेंचा सवाल
Follow us on

पुणे: महाराष्ट्रात जरा काय घडलं की राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणारे उत्तर प्रदेशातील घटनांच्या वेळी कुठे जातात, असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. देशात लोकशाहीचा गळा घोटला जातोय, लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. (Amol Kolhe ask questions silence of opposition party leaders on hathras case )

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन देशभरात संताप व्यक्त होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना लोकशाहीवर घाला घालणारी असून उत्तर प्रदेश सरकारची दडपशाही असल्याची टीका शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

एखाद्या कुटुंबांत दुदैवी घटना घडल्यानंतर त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी समाज पुढे येत असतो. मात्र, उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेनंतर या ठिकाणी कुटुंबियांना भेटण्यापासून मज्जाव केला जातो. हि निंदनीय बाब असून नेहमी प्रत्येक गोष्टीवर बोलणारे भाजपाचे नेते यावेळी मूग गिळुन गप्प असल्याची कोपरखळी अमोल कोल्हेंनी भाजपला लगावली आहे.

पार्थ पवार यांच्या ट्वीट संदर्भात विचारले असता हे त्यांचे मत वैयक्तिक मत आहे. सगळ्यांना व्यक्तिस्वांतत्र्य आहे. पक्षनेतृत्वाने मत व्यक्त केल्यानंतर त्यावर मत व्यक्त करण गरजेचे नाही, असे औषधांची किमंत, रेमडेसिव्हीर, टेलीमेडीसीन, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे अमोल कोल्हेंनी सांगितले.

संबंधित बातम्या:

Amol Kolhe | मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे – खासदार अमोल कोल्हे

अमोल कोल्हे-शिवाजीराव पाटील यांच्यात ट्विटर वॉर

(Amol Kolhe ask questions silence of opposition party leaders on hathras case )