मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक निस्सीम भक्त होता. पहिल्याच भेटीत त्याने शिवाजी महाराज यांना आपले गुरु मानले. यमुनेपासून नर्मदेपर्यंत आणि चंबळपासून टोंसपर्यंत त्या शिष्याची तलवार अशी तळपली की त्याच्या तेजापुढे बलाढ्य मुघल फिके पडले. मुघलांविरोधात त्याने एक दोन नव्हे तर तब्बल 52 लढाया जिंकल्या. त्यामागे प्रेरणा होती ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याच्या मनात चेतवलेल्या स्वराज्याच्या स्फुलिंगाची. त्यावेळी त्याच्याजवळ अवघे पाच घोडदळ आणि 25 तलवारबाज इतकेच सैन्य होते. पण, त्याने त्याच सैन्याच्या बळावर मुघलांशी संघर्ष सुरु केला. त्याच्या पराक्रमाची चर्चा होऊ लागली सैन्य वाढू लागले. स्वतःचे राज्य उभे राहिले आणि तब्बल 80 वर्ष त्यांनी राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिष्य, बाजीराव पेशवे यांचे सासरे आणि बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल बुंदेला यांनी हिंदुस्थानाला कलाटणी देणारा इतिहास घडवला. कोण होते छत्रसाल बुंदेला? KING CHATRSAL BUNDELA छत्रसाल यांचे पिता चंपतराय हे बुंदेलखंडातील महोबा राज्याचे राजे होते. मुघल बादशहा शाहजहान याच्याविरोधात मुलगा औरंगजेब याने बंड...