हैदराबाद : बाळाच्या जन्माआधीच डोळे मिटलेल्या आंध्र प्रदेशातील गर्भवतीवर मृत्यूनंतरही दुर्दैवी वेळ ओढवली. गावकऱ्यांनी अंधश्रद्धेतून महिलेचे पार्थिव झाडाला बांधण्याची जबरदस्ती कुटुंबावर केली. अखेर पोलिसांनी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. (Andhra Pradesh Police perform last rites of pregnant woman after locals forced family to refuse cremation fearing superstition)
23 वर्षीय महिलेला प्रसुतीसाठी आंध्र प्रदेशातील नांद्यालच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. त्याच दिवशी तिचे नातेवाईक तिचा मृतदेह घेऊन गावी गेले.
काही गावकऱ्यांनी गर्भवतीवर अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबाला विरोध केला. “तिच्या गर्भाशयात बाळ असल्याने गावासाठी ते चांगले नाही” अशा अंधश्रद्धेतून हा विरोध झाल्याचे रुद्रराम पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राममोहन रेड्डी यांनी सांगितले.
गावकऱ्यांनी तिच्या कुटुंबातील सदस्यांना अंत्यसंस्कार करण्यास कडाडून विरोध दर्शवला. अखेर नाईलाजाने तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिचा मृतदेह पेड्डा कांबुलुरु गावाजवळील जंगलात नेला आणि तो झाडाला बांधून तसेच सोडून ते निघून आले.
जवळपासच्या गावातील काही स्थानिकांना हा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. त्यांनी रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास पोलिसांना याची माहिती दिली. सोमवारी सकाळी पोलिसांनी तिच्या कुटुंबातील सदस्य आणि स्थानिक मंडळ महसूल अधिकारी (एमआरओ) यांच्या उपस्थितीत पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
हेही वाचा : माहेरी गेलेल्या पत्नीचा फोटो फेसबुकवर पाहून संताप, तीन मुलांची हत्या करुन पित्याची आत्महत्या
महिलेच्या कुटुंबाला गावात अंत्यसंस्कार करण्याची परवानगी न देण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कलम 259, 270, 297 आणि 504 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Andhra Pradesh: Police y’day performed last rites of a pregnant woman who died during childbirth in Kurnool’s B Nagireddypalli village,after some locals objected to her funeral due to superstition. Her family had to leave her body tied to a tree in forest. Police booked 15 people pic.twitter.com/d0UV1d0e3y
— ANI (@ANI) June 29, 2020