अनिल परब यांच्या घरी ईडीने (Anil Parab ED raid) धाड टाकल्यानं एकच खळबळ उडाली. गुरुवारी सकाळीच ईडीकडून छापेमारी करण्यात आली. महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्याच्या घरावर ईडीनं (ED) पहाटेपासून छापेमारीला सुरुवात केल्यानं महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Politics) पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. महाराष्ट्रातील ही सगळ्यात मोठी घडामोड असून राज्याचं राजकारण आता पुन्हा तापायला सुरुवात झालीये. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर करण्यात आलेला नेमका आरोप काय आहे? ईडीने नेमकी कुठे कुठे कारवाई केली? जाणून घेऊयात सात सोप्या मुद्द्यांमधून…