आतापर्यंत पाहिले लोकसभेच्या भाषणांपैकी मला सर्वात आवडलेलं भाषण आहे. नरेंद्र मोदींनी अविश्वसनीय भाषण दिलं. हे भाषण ऐकल्यावर मला काही सुचेना…उत्कृष्ट भाषण मोदींनी केलं. जसं त्यांनी लोकसभेत सांगितलं मोदींची गॅरंटी आहे. मी जे म्हणतो ते होणार आणि त्यानंतर परत असं एक इंटरेस्टिंग भाषण झालं. मोदींनी एक ट्विट केलं की, जिसने खाया है उससे बाहर निकालूंगा… जिसका खाया है उसको लौटाऊंगा हे ऐकल्यावर इतकं समाधान झालं, असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. त्या टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या.
मुद्दाम मला सांगावसं वाटलं की मी ते ट्विट देखील केलं. मोदींची गॅरंटी त्यांनी परत परत जनतेला दिली. ही पण गॅरंटी आहे का? आणि असेल तर महाराष्ट्राचे 70 हजार चा जो स्कॅम झाला नंतर तो एक लाख दहा हजार कोटीपर्यंत गेला. त्या सिंचन घोटाळ्याचे पैसे अजित पवारांकडून परत घेणार का? आणि महाराष्ट्राला परत देणार का हा सगळ्यात मोठा सवाल आहे, असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली. याला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं. अंजली दमानिया यांची नार्को टेस्ट करा. अंजली दमानिया कुणाच्या सांगण्यावरून काम शकतात. त्या नेत्या नाहीत रिचार्जवर चालणारी बाई आहे. सुपारी मिळाली की मागे लागतात, असं सूरज चव्हाण म्हणाले.
सूरज चव्हाण यांच्या टीकेला अंजली दमानिया यांनी प्रत्युत्तर दिलंय. राजकारणात यांना महिलेने काही बोललेलं अजिबात खपून घेत नाही. त्या महिलेला बाजूला करायचा असेल तर तिच्याबद्दल खालच्या दर्जाचा आणि वाटेल ते बोलायचं. सूरज चव्हाण आणि अजित पवारांना माझं वॉर्निंग आहे. त्यांनी जी भाषा आता वापरली ही बाई काय रिचार्जवर काम करते, सुपारी घेते. असले फालतू डायलॉग त्यांनी त्यांच्या खिशात ठेवावेत. यापुढे मला माफी पाहिजे. त्याने जर माफी दिली नाही. तर या व्यक्तीला मी सोडणार नाही, असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.