देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांची घोषणा, सुरेश वाडकर, राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री

| Updated on: Jan 25, 2020 | 10:28 PM

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांची यादी जाहीर केली आहे (Announcement of Padma Awards).

देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांची घोषणा, सुरेश वाडकर, राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री
Follow us on

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांची यादी जाहीर केली आहे (Announcement of Padma Awards). एकूण 141 जणांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यात 7 पद्मविभूषण, 16 पद्मभूषण आणि 118 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. 141 पुरस्कार्थींमध्ये 34 महिलांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातून राहीबाई पोपेरे आणि सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे (Announcement of Padma Awards).

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पद्मविभूषण आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

उद्योजक आनंद महिंद्रा आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. करण जोहर, एकता कपूर, कंगना राणावत, राहीबाई पोपेरे, अदनान सामी, सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

पुरस्काराच्या घोषणेनंतर चेन्नईत जयललितांवरील चित्रपटाची शुटिंग करत असलेल्या कंगणा राणावतने आपली भावना व्यक्त केली. कंगणा म्हणाली, “हा पुरस्कार मिळाल्याने मी माझ्या देशाचे आभार मानते. मी अत्यंत विनम्रपणे हा पुरस्कार स्विकारते. मी हा पुरस्कार आपलं स्वप्न पूर्ण करण्याची हिम्मत ठेवणाऱ्या महिलांना समर्पित करते. या देशाला अधिक चांगलं बनवण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक मुलीला, आईला मी हा पुरस्कार समर्पित करते”.