अँटीबायोटिकमुळे भारतात दरवर्षी 58 हजार मुलांचा मृत्यू

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : अँटीबायोटिक औषधांचा वापर सध्या देशात मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यामुळे भारतात दरवर्षी 58 हजार मुलांना आपला जीव गमवावा लागत आहे, असा अहवाल सेंटर फॉर डिसीज डायनॅमिक्स इकोनॉमिक्स पॉलिसी (सीडीडीईपी) या संस्थेने सादर केला. शहरांतील कचरा आणि सांडपाणी यामुळेही पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. रविवारी झालेल्या जागतिक ‘अँटीबायोटिक जागरुकता सप्ताह’च्या […]

अँटीबायोटिकमुळे भारतात दरवर्षी 58 हजार मुलांचा मृत्यू
Follow us on

मुंबई : अँटीबायोटिक औषधांचा वापर सध्या देशात मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यामुळे भारतात दरवर्षी 58 हजार मुलांना आपला जीव गमवावा लागत आहे, असा अहवाल सेंटर फॉर डिसीज डायनॅमिक्स इकोनॉमिक्स पॉलिसी (सीडीडीईपी) या संस्थेने सादर केला. शहरांतील कचरा आणि सांडपाणी यामुळेही पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. रविवारी झालेल्या जागतिक ‘अँटीबायोटिक जागरुकता सप्ताह’च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा अहवाल सीडीडीईपी संस्थेने सादर केला.

दरवर्षी जगभरात सात लाख लोक अँटीबायोटिकच्या सेवनामुळे आपला जीव गमावत आहेत. एकट्या भारतात तब्बल 58 हजार लोक आपला जीव गमावत असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे. हा आकडा खरंच गंभीर आहे. शहरातील कचरा, दुषित पाणी यांमुळे अनेक आजार पसरत आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अँटीबायोटिकचा वापर वाढला आहे.

सीडीडीईपीच्या संशोधनानुसार 2000 सालापासून ते 2015 पर्यंत अँटीबायोटिकचा वापर 65 टक्क्यांनी वाढला आहे. तर कमी उत्पन्न असलेल्या देशांत याचा वापर हा 114 टक्क्यांनी वाढलेला आहे. भारतामध्ये याचे प्रमाण 103 टक्क्यांनी वाढले आहे, असे सीडीडीईपीचे दक्षिण आशियाचे प्रमुख ज्योती जोशी यांनी यावेळी सांगितले.

भारत जगाची फार्मसी म्हणून ओळखली जाते. गंभीर औषधांच्या अग्रगण्य उत्पादकांमध्ये ज्यात अँटीबायोयिक्सचा समावेश आहे, अशा औषांधाच्या उत्पादनामुळे नद्यांचे आणि पर्यावरणाचे मोठे नुकसाना होत असल्याचे जोशी यांनी सांगितले.

काय आहे अँटीबोयटिक?

अँटीबायेटिक एक असे औषध आहे जे जीवाणूंना नष्ट करते आणि त्यांना वाढण्यापासून रोखते. याचा उपयोग सुक्ष्मदर्शी जीवाणूंमुळे होणाऱ्या आजारावेळी केला जातो. बॅक्टेरिया जर आपल्या शरीरात असतील, तर त्यांच्याशी लढण्यासाठी या औषधांचा वापर केला जातो. हा पण अँटीबायोटिक औषधांचे सेवन अति प्रमाणात करणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून धोकादायक ठरु शकते.