वेलिंग्टन : न्यूझीलंडमध्ये सुपर स्मॅश टी 20 लीग (New Zealand Super Smash T20 League) ही स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स आणि नॉर्थन डिस्ट्रिक्ट्स या दोन संघांमध्ये आज एक टी 20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सेंट्रल टीमने नॉर्थन टीमसमोर 223 धावांचा डोंगर उभा केला होता. या सामन्यात नॉर्थनचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज अँटन डेवसिचने (Anton Devcich) तुफानी शतक ठोकलं खरं परंतु तो त्याच्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. संघाला पराजयापासून वाचवू शकला नसला तरी अँटनने मैदानावर केलेल्या चौफेर फटकेबाजीमुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले. (Anton Devcich hits hard in Super Smash T20 match between Central Districts vs Northern Districts)
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सने सहा विकेट्सच्या बदल्यात 223 धावा केल्या. नॉर्थनकडून सलामीवर जॉर्ज वर्करने सर्वाधिक 42 चेंडूत 71 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 3 शानदार षटकार ठोकले. त्यानंतर डग ब्रेसवेलने अंतिम षटकात नॉर्दनच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला करत संघाला 200 धावांचा टप्पा पार करुन दिला. ब्रेसवेलने अवघ्या 25 चेंडूत 55 धावा फटकावल्या. तसेच यष्टीरक्षक फलंदाज डेन क्लीवरने 21 चेंडूत 27 आणि जोश क्लार्कसनने 13 चेंडूत 25 धावांचं योगदान दिलं.
आव्हान मोठं होतं, त्यामुळे नॉर्थन डिस्ट्रिक्ट्रसला धडाकेबाज सुरुवातीची गरज होती. परंतु तसं झालं आहे. अवघ्या 30 धावांवर नॉर्थनचे तीन फलंदाज माघारी परतले. दरम्यान चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार अँटन डेवसिचने डाव सावरला आणि एका बाजूने सेंट्रलच्या गोलंदांजांवर तुफानी हल्ला सुरु केला. परंतु दुसऱ्या बाजूने नॉर्थनच्या विकेट्स जाणं सुरुच होतं. कोणताही फलंदाज डेवसिचची साथ देत नव्हता. अशा परिस्थितीत डेवसिचने मात्र स्वतःच्या बाजूने प्रयत्न सुरुच ठेवले. परंतु त्यांचा संघ 45 धावांनी पराभूत झाला. डेवसिच 102 धावांवर असताना धावबाद झाला. त्याने 48 चेंडूत शतक पूर्ण केलं. नॉर्थनने 9 विकेट्सच्या बदल्यात निर्धारित 20 षटकात अवघ्या 178 धावा केल्या.
डेवसिचने 49 चेंडूत 102 धावांची खेळी केली. त्यात त्याने 9 षटकार आणि 7 चौकार लगावले. उल्लेखनिय बाब म्हणजे. त्याने 82 धावा केवळ चौकार आणि षटकारांच्या सहाय्याने अवघ्या 16 चेंडूतच फटकावल्या. तरीदेखील त्याच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचा संघ पराभूत झाला कारण डेवसिचवगळता नॉर्थनच्या प्रत्येक फलंदाजाने हाराकिरी करत आपल्या विकेट गमावल्या. नॉर्थनच्या एकाही फलंदाजाला 20 पेक्षा जास्त धावा जमवता आल्या नाहीत.
संबंधित बातम्या
रवींद्र जाडेजा टीम इंडियाचा नवा संकटमोचक, सध्याच्या घडीचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू
भारताच्या भेदक माऱ्याला आमचे फलंदाज घाबरले, रिकी पॉन्टिंगचा स्ट्रेट ड्राईव्ह
(Anton Devcich hits hard in Super Smash T20 match between Central Districts vs Northern Districts)