नवी मुंबई : देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यासह देशावर कोरोनाचे संकट कोसळले (AMPC Market Employee voluntary retirement) आहे. या परिस्थितीमध्ये आपत्कालीन यंत्रणा दिवस रात्र झटत आहे. त्यात शासकीय, निमशासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पण या संकटात काही अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेऊन जबाबदारीतून पळ काढू पाहत असल्याचे चित्र नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये दिसून येत आहे. एपीएमसी मार्केटमधील तब्बल 20 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी (AMPC Market Employee voluntary retirement) अर्ज केले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अन्य कोणत्याही कामांना प्राधान्य न देता सर्वत्र कोरोनावर लक्ष केंद्रित केलं जात आहे. दिवसेंदिवस एपीएमसीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एपीएमसीतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. पण कोरोनाच्या भीतीमुळे जवळपास 20 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिल्याचे म्हटलं जात आहे. यामध्ये अधीक्षक अभियंता विलास विरादार, सह सचिव अविनाश देशपांडे यांच्यासह सुरक्षा विभाग, अभियंता विभाग, प्रशासन, भाजीपला मार्केट, फळ मार्केट भागातील काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे.
देशात कोरोनाचे रुग्ण सापडल्यापासून केंद्र आणि राज्य सरकारने आपत्कालीन परिस्थिती घोषित केली आहे. 13 मार्च पासून साथरोग कायद्याही लागू झाला आहे. एपीएमसीमध्ये विविध कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या संदर्भात जबाबदारी दिली आहे. जसे जसे कोरोनाचे कहर सुरू झाले, तसे तसे एपीएमसीमधील अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दिले आहेत.
एपीएमसीमध्ये पाच मार्केटमधील येणाऱ्या गाड्यांना सॅनिटायझर करणे, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देखभाल करणे, आवक जावकवर नजर ठेवणे यासाठी रात्र-दिवस एपीएमसीचे प्रशासक आणि सचिव काम पाहत आहेत. मात्र काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी स्वेच्छानिवृतीचे अर्ज दिले आहेत. त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या महामारीमध्ये काम करायचं नाही असे दिसून येत आहे. मात्र त्यांच्या नजरा एपीएमसीच्या तिजोरीवर आहे, असा आरोप केला जात आहे.
एपीएमसीच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये खाली होऊन आर्थिक परिस्थिती कोलमोडणार असे दिसून येत आहे. वास्तविक पाहता भारतामध्ये आर्थिक परिस्थिती गंभीर होऊन लाखो लोकांचे रोजगार जाण्याची शक्यता आहे, अशी परिस्थिती असतानाही एपीएमसीचे काही अधिकारी आणि कर्मचारी यांनी निवृत्तीसाठी अर्ज दिला आहे. पूर्ण भारतात आणीबाणीची परिस्थिती असल्याने स्वेच्छानिवृत्ती बंद असताना केवळ एपीएमसीमध्ये सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे निवृत्तीसाठी ज्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अर्ज दिले आहेत. त्यापैकी काही अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारच्या तक्रारी आहेत. या चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी त्यांनी निवृत्ती घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न चालवल्याची चर्चा एपीएमसीमध्ये सुरु आहे. परंतु त्यांना स्वेच्छानिवृत्ती मिळाल्यास मागील काही महिन्यात एपीएमसीमध्ये घडलेले अनेक घोटाळे दडपले जातील, असंही म्हटलं जात आहे.
“एपीएमसीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळीवर काम सुरू आहे. काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी जे अर्ज केले आहे त्यावर आता कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही”, असं एपीएमसी मार्केटचे प्रशासक आणि सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
Navi Mumbai Corona : नवी मुंबईत एकाच दिवसात 25 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 300 पा
भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर सॅनेटायझेशन टनेल, नवी मुंबई एपीएमसीचा नाविन्यपूर्ण उपक्रम