मुंबई : सोशल मीडियाच्या या जगात कधी काय ट्रेंड करेल याचा नेम नाही. आता हेच पाहा, भारतात सध्या तरुणांना ते त्यांच्या वृध्दापकाळात कसे दिसतील हे जाणून घ्यायचं वेड लागलं आहे. सध्या भारतातील तरुणांमध्ये Face App ची क्रेझ पाहायला मिळत आहे. या Face App च्या मदतीने अनेक तरुण स्वत:ला वृद्ध दाखवत आहेत. यामध्ये सामान्य तरुणांपासून ते सेलिब्रिटी सर्वांनाच या अॅपचं वेड लागलं आहे.
सोशल मीडियावरही हे अॅप ट्रेंडमध्ये आहे. या Face App च्या मदतीने कुणीही व्यक्ती आपल्या फोटोला एडीट करुन ती 50-60 वर्षांनंतर कशी दिसेल ते पाहू शकते. एडीट केल्यानंतर जो रिझल्ट समोर येतो आहे, ते पाहून भूवया उंचावल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तरुणामध्ये या अॅपची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.
सामान्य लोकच नाही, तर सिनेसृष्टीतील अभिनेत्यांनाही या अॅपचं वेड लागलं आहे. वरुण धवन, अर्जुन कपूर यांसारख्या अभिनेत्यांनी सोशल मीडियावर त्यांचे एडीट केलेले वृध्द वयातील फोटो शेअर केली आहेत.
अभिनेता अर्जुन कपूर हा 50–60 वर्षांनंतर कसा दिसेल? याची एक झलक आपल्याला त्याच्या या फोटोतून पाहायला मिळते. त्याने Face App च्या मदतीने त्याचा फोटो एडीट केला. “माझं वृद्धत्व असं असेल”, असं म्हणत अर्जुनने इन्स्टाग्रामवर त्याचा हा वृद्ध वयातील फोटो शेअर केला.
अर्जुनचा हा फोटो पाहून त्याची बहीण आणि धडक फेम जान्हवी कपूर आश्चर्यचकित झाली. “Omg”, अशी कमेंट तिने या फोटोवर दिली. त्याशिवाय, अभिनेत्री परिणिती चोप्रा, हुमा कुरेशी आणि दिया मिर्झानेही अर्जुनच्या या फोटोवर कमेंट केली.
अर्जुन कपूरप्रमाणे अभिनेता वरुण धवननेही स्वत:चा वृद्ध वयातील फोटो शेअर केला. त्यानेही इन्स्टाग्रामवर त्याचा हा फोटो शेअर केला. विशेष म्हणजे या फोटोमध्ये वरुण धवन हा अभिनेता अनिल कपूरसारखा दिसत आहे. “जेव्हा अनुल कपूर 100 वर्षांचे होतील तेव्हा ते असे दिसतील”, असं कॅप्शन वरुणने या फोटोला दिलं.
Haha so true ❤️ @AnilKapoor ❤️ pic.twitter.com/ugdwDrOvo0
— Harsh Vardhan Chand ?? (@harshchand007) July 17, 2019
वरुणच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत. सोनाक्षी सिन्हा, आयुष्मान खुराणा, नरगीस फाख्री आणि हुमा कुरैशीसारख्या सेलिब्रिटिंनी त्याच्या या फोटोवर कमेंट केली आहे.
अभिनेतेच नाही तर खेळाडूंचे फोटोही Face App ने एडीट करुन शेअर केले जात आहेत.
संबंधित बातम्या :
कोटींची संपत्ती, तरीही आठ हजारांसाठी अक्षयने चॅलेंज स्वीकारलं
बिग बॉसच्या अंतिम फेरीसाठी लैंगिक संबंधाची मागणी, महिला पत्रकाराचा गौप्यस्फोट
जॉन सीनाने शेअर केलेल्या फोटोला शिल्पा शेट्टीचं उत्तर
‘Sacred Games-2’चा ट्रेलर रिलीज, ‘या’ पाच प्रश्नांची उत्तरं मिळणार!