‘पानिपत’च्या शूटिंगदरम्यान अर्जुन कपूर जखमी

| Updated on: Jun 20, 2019 | 9:21 PM

'पानिपत' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर जखमी झाला आहे. अर्जुनने सोशल मीडियावर याबाबतचा एक फोटो शेअर केला आहे.

पानिपतच्या शूटिंगदरम्यान अर्जुन कपूर जखमी
Follow us on

मुंबई : ‘पानिपत’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर जखमी झाला आहे. अर्जुनने सोशल मीडियावर याबाबतचा एक फोटो शेअर केला आहे.

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानिपत-द ग्रेट बेट्रेयल’ या आगामी चित्रपटात अर्जुन मुख्य  भूमिका साकारत आहे. या चित्रपटात मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे या महत्त्वपूर्ण भूमिकेत अर्जुन दिसणार आहे. यासाठी तो दिवस-रात्र जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे. या भूमिकेसाठी त्याने स्वत:चे वजनही वाढवले आहे. याच चित्रपटासाठी अर्जुनने घोडा स्वारी शिकली आहे.

 

विशेष म्हणजे त्याने आपली शरीरयष्टीही बदलली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर जीममधील एक फोटो शेअर केला होता. यात त्याने एखाद्या पैलवानाप्रमाणे शरीरयष्टी तयार केली आहे. त्याशिवाय अर्जुनने मराठीचे धडे गिरवण्याचा निर्णय घेतला आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित चित्रपटातील भूमिका प्रभावीपणे साकारण्यासाठी अर्जुनने हे पाऊल उचललं आहे.

नुकतंच अर्जुन पानिपत या शूटिंग करत असताना जखमी झाला. त्याला कपाळाला इजा झाली. याबाबतचा एक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला. त्या फोटोला कॅप्शन देताना त्याने आऊच…असे लिहीले. या कॅप्शनवरुन त्याला झालेल्या जखम खूप दुखत असावी अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

या चित्रपटात अर्जुनसोबत अभिनेता संजय दत्त, पद्मिनी कोल्हापूरे, अभिनेत्री क्रिती सनॉन हे कलाकार दिसणार आहे. यात अर्जुन मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे यांची भूमिका साकरणार आहे. या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच 6 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : पुतण्याच्या वाढदिवशी सलमानचा काळजाचा ठोका चुकवणारा स्टंट

शूटिंगदरम्यान अभिनेत्री माही गिलसह दिग्दर्शकांवर गुंडांचा हल्ला