लेह लडाख : भारत आणि चीन यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे LAC वर कोणत्याही वेळी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं वातावरण निर्माण झालं आहे. “जरी चिनी सैन्य LAC वर कुरघोड्या करत असलं, तरी भारतीय सैन्याने संपूर्ण तयारी केली आहे. सैनिकांचा आत्मविश्वास हिमालयाएवढा आहे, त्यांना फक्त आदेशाची गरज आहे” असे वक्तव्य भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना केले. (Army Chief General Manoj Mukund Naravane on India China Situation at LAC)
सैन्यप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी काल लेहमधल्या सैन्य तळाला भेटी दिल्या. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सविस्तर माहिती दिली. “मी तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलत होतो, तेव्हा अनेक सैनिकांसह अधिकाऱ्यांचा उत्साह कौतुकास्पद होता. सैनिकांनी युद्धासाठी लागणारी संपूर्ण तयारी केली आहे. सध्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर परिस्थिती तणावपूर्ण असल्याने ही तयारी करण्यात आली आहे.” अशी माहिती नरवणे यांनी दिली.
“समोर येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे. जगाच्या पातळीवर भारतीय सैन्य नेहमीच अग्रेसर आहे आणि ते राहील. चीन सीमेवर कधीही तणावपूर्ण घटना घडण्याची शक्यता आहे. भारतीय सैन्याच्या सुरक्षिततेवर आणि अखंडतेवर कुठलीही बाधा येऊ देणार नाही” अशी ग्वाही नरवणे यांनी दिली.
#WATCH: Army Chief General Manoj Mukund Naravane says to ANI, “The situation along LAC is slightly tensed. Keeping in view of the situation, we have taken precautionary deployment for our own safety & security, so that our security & integrity remain safeguarded.” pic.twitter.com/NvONwyJvbM
— ANI (@ANI) September 4, 2020
चीनी लष्कराने पूर्व लडाखमधील सीमेवरील सहमती रेषेचे 29 ऑगस्ट रोजी रात्री उल्लंघन केल्याची माहिती भारत सरकारने दिली होती. चिनी सैनिकांनी प्रक्षोभकपणे सीमेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सैनिकांनी सडेतोड उत्तर देत त्यांना रोखले, असे सरकारने म्हटले.
संबंधित बातम्या :
चीनी लष्कराची पुन्हा आगळीक, पूर्व लडाखमधील सीमेवरील सहमतीचे उल्लंघन, भारतीय सैनिकांचे सडेतोड उत्तर
(Army Chief General Manoj Mukund Naravane on India China Situation at LAC)