राफेल, उद्योगपतींची कर्जमाफीनंतर आता पुढचं खोटं ईव्हीएम : जेटली

| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

नवी दिल्ली : भाजपने 2014 ची निवडणूक ईव्हीएममध्ये छेडछाड करुन जिंकली होती, असा दावा सईद शूजा या कथित हॅकरने केलाय. लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन या हॅकरने खळबळजनक गौप्यस्फोट केले. ईव्हीएम हॅकिंगची भाजप नेते गोपीनाथ मुंडेंना माहिती होती, म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली, असा दावाही या हॅकरने केलाय. पण हे एक राजकीय षडयंत्र असल्याचं प्रत्युत्तर अर्थमंत्री […]

राफेल, उद्योगपतींची कर्जमाफीनंतर आता पुढचं खोटं ईव्हीएम : जेटली
Follow us on

नवी दिल्ली : भाजपने 2014 ची निवडणूक ईव्हीएममध्ये छेडछाड करुन जिंकली होती, असा दावा सईद शूजा या कथित हॅकरने केलाय. लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन या हॅकरने खळबळजनक गौप्यस्फोट केले. ईव्हीएम हॅकिंगची भाजप नेते गोपीनाथ मुंडेंना माहिती होती, म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली, असा दावाही या हॅकरने केलाय. पण हे एक राजकीय षडयंत्र असल्याचं प्रत्युत्तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलंय.

राफेल व्यवहार प्रकरण, उद्योगपतींची कथित कर्जमाफी यानंतर आणखी एक खोटं म्हणजे हे ईव्हीएम प्रकरण आहे, असं अरुण जेटलींनी म्हटलंय. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात निवडणूक आयोग आणि ईव्हीएम तयार करणारे, निवडणुकीत सहभागी हजारो कर्मचारी यांची भाजपशी सांगड होती का? निव्वळ मूर्खपणा आहे, असं ट्वीट अरुण जेटलींनी केलंय.

काँग्रेसने लोकांना एवढं मूर्ख समजलंय का, की कोणताही कचरा फेकला की तो लोक गिळून घेतील? काँग्रेस पक्षातला वेडेपणा आता वेगाने संक्रमक होत चाललाय, असंही अरुण जेटलींनी म्हटलंय.

काय आहे हॅकरचा दावा?

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही, याबाबत अमेरिकन सायबर एक्स्पर्टने मोठा दावा केला आहे. अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सईद शूजा असं या एक्स्पर्टचं नाव आहे, त्याने लंडनमध्ये दावा केला आहे की, 2014 च्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंग माहित होतं, त्यामुळेच त्यांची हत्या झाली. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक केलं होतं. 14 लोकांच्या टीमने हे काम केलं होतं. त्यापैकी काहींची हत्या झाल्याचाही दावा अमेरिकेच्या एक्स्पर्टने लंडनमध्ये केला आहे. तर दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या सांगण्यावरुन हॅक केलं असल्याचाही दावा करण्यात आला.