मुंबई | 1 फेब्रुवारी 2024 : शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज आणि उद्या ( 1 व 2 फेब्रुवारी) रायगड लोकसभा मतदारसंघात दौरा करणार आहेत. त्यानंतर 4 आणि 5 फेब्रुवारीला ते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दौरा करणार आहेत. त्यांच्या याच दौऱ्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे. ‘रायगडचा झंझावाती दौरा गाड्यांवर हिरवे झेंडे लावून होणार का ?’ असा खोचक सवाल आशिल शेलार यांनी विचारला आहे.
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ट्विट करत टीकास्त्र सोडलं आहे. रत्नागिरीत जाऊन दाऊदच्या मालमत्तांचीही आस्थेने पाहणी करून या ! असंही शेलारांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
काय म्हणाले आशिष शेलार ?
शिवरायांच्या वशंजाकंडे पुरावे मागणारे उबाठाचे प्रमुख आपल्या अस्तित्वाच्या जुन्या खूणा शोधण्यासाठी रायगड दौरा करीत आहेत. मुंबईतील मालवणी, बेहरामपाडा, महमद अली रोड आणि मुंब्रा येथील तुमच्या सगळ्या शिलेदारांना सोबतच घेऊन जा ! जमलंच तर.. दाऊदच्या मालमत्तांचा नुकताच लिलाव झालाय, रत्नागिरीत जाऊन त्याची पण आस्थेने पाहणी करुन या ! रायगडचा झंझावाती दौरा गाड्यांवर हिरवे झेंडे लावून होणार का ? असा खोचक सवाल विचारत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली आहे.
◆ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाकडे पुरावे मागणारे उबाठा गटाचे प्रमुख आपल्या अस्तित्वाच्या जुन्या खूणा शोधण्यासाठी रायगड दौरा करीत आहेत…
◆ “मलपत्रात” बातमी आलेय की,
उध्दव ठाकरे यांचे रायगडमध्ये स्वागत मुंबईतील मराठी मुस्लिम सेवा संघाचे शिलेदार करणार आहेत…!उत्तम……
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 1, 2024
तर सुनील तटकरे यांनीही टीका केली आहे. उद्धवजी रोह्यात येत आहे, त्यांना शुभेच्छा. पण यापूर्वी त्यांनी निवडणूक पूर्व दौरा कधीच केला नव्हता. याचा अर्थ स्पष्ट आहे की, ही निवडणूक अनंत गीतेंना खूप जड जाणार असल्याची जाणीव असल्यानेच उद्धव ठाकरेंनी हा सखोल दौरा आयोजित केला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंचा दोन दिवस रायगड दौरा
उद्धव ठाकरे आज आणि उद्या रायगड दौऱ्यावर आहेत. तर रे 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. दोन दिवशी या दौऱ्यात स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांसोबत आगामी निवडणुकीची रणनीती ते तयार करणार आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि नारायण राणे यांच्या मतदार संघावर उद्धव ठाकरे लक्ष केंद्रीत करणार आहेत.