Astrology 2023 : ऑगस्ट महिन्याच्या मध्यात मंगळाची असेल कृपा, चार राशींना मिळणार पैसाच पैसा!

| Updated on: Jul 24, 2023 | 6:42 PM

ज्योतिषशास्त्रात मंगळाला सेनापतीचा दर्जा देण्यात आला आहे. मंगळाच्या गोचराचा राशीचक्रावर परिणाम होत असतो. आता ऑगस्टच्या मध्यात काही राशींची चांदी होणार आहे. वाचा ज्योतिषशास्त्रीय गणित

Astrology 2023 : ऑगस्ट महिन्याच्या मध्यात मंगळाची असेल कृपा, चार राशींना मिळणार पैसाच पैसा!
मंगळ ग्रहाची ऑगस्ट महिन्यात असेल चार राशींवर कृपादृष्टी, कसं ते जाणून घ्या ज्योतिषशास्त्र
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह लवकरच गोचर करणार आहे. 17 ऑगस्टला दुपारी 3 वाजून 14 मिनिटांनी सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे राशी चक्रावर परिणाम दिसून येईल. इतकंच काय तर मेष, मिथुन राशींसह चार राशींना मंगळाचं पाठबळ मिळणार आहे. मंगळ हा ग्रह साहस आणि उर्जेचा कारक ग्रह मानला जातो. मंगळाच्या गोचरामुळे चार राशीच्या जातकांना जबरदस्त फायदा होणार आहे. तसेच चंद्राची मंगळासोबत युतीमुळे लक्ष्मी योग जुळून येईल. चला जाणून मंगळाच्या गोचरामुळे कोणत्या राशींना कसा फायदा होईल ते..

या राशीच्या जातकांना बसेल फटका

मेष : या राशीच्या जातकांना मंगळ गोचराचा फायदा होणार आहे. मंगळाला ग्रहांमध्ये सेनापतींचा दर्जा असल्याने शत्रूंवर विजय मिळवाल. नशिबाची साथ तुम्हाला या काळात मिळेल. साहस आणि आत्मविश्वासात वाढ होईल. हा काळ तुमच्यासाठी शुभ असणार असून या कालावधीत जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

मिथुन : प्रॉपर्टी किंवा घर खरेदीचा योग जुळून येईल. उद्योग धंद्यात या काळात भरभराट दिसून येईल. धनलाभाचा प्रबळ योग आहे. भुतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून काही लाभ मिळू शकतो. केलेल्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. त्यामुळे हाती आलेली संधी सोडू नका.

कर्क : मंगळाच्या गोचरामुळे आत्मविश्वास आणि आत्मिक उर्जा वाढेल. भावा बहिणींची साथ मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना केलेल्या मेहनतीचा फायदा मिळेल. प्रमोशन किंवा इंक्रिमेंट या काळात मिळू शकते. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या जातकांना फायदा मिळेल. प्रत्येक कामात थोड्या मेहनतीने यश मिळेल.

वृश्चिक : मंगळाच्या गोचरामुळे प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. नव्या लोकांच्या भेटीगाठी होतील. तसेच त्यांच्या मार्गदर्शनामुळे काही कामं मार्गी लागतील. कौटुंबिक मदत मिळेल आणि प्रत्येक कामातून अपेक्षित फळ मिळेल. प्रमोशन होण्याची या काळात शक्यता आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)