ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत राशी बदलत असतो. ग्रहांच्या संक्रमणामुळे प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीवरही परिणाम होतो. प्रत्येक ग्रहाच्या राशी बदलाचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. 2 जुलै रोजी बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश करेल आणि 16 जुलै रोजी सूर्य देव कर्क राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत जुलैमध्ये मंगळ आणि शुक्रही बदलतील. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी धनलाभाचे योग संभवतात.
ज्योतिषी म्हणजे तणावात असलेल्या व्यक्तींना वेळेवर अचूक मार्गदर्शन करून त्यांना योग्य तो मार्ग सांगून तणावातून बाहेर काढणारा व्यक्ती. समाजाचा मार्गदर्शक म्हणूनच ज्योतिषाची भूमिका असायला हवी.
महाभारतात अर्जुनाने जेंव्हा युद्धास नकार दिला. तेंव्हा त्याला भगवान कृष्णाने दृष्टांत देत उपदेश दिला होता. त्यावेळी र्शीकृष्णाने अर्जुनाला मानसिक तणावातून बाहेर काढले. तेव्हा अर्जुनाने युद्ध केले आणि तो युद्ध जिंकलाही. यावरून ज्योतिषांनी समाजाला तणावातून बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न करावे. तसे केल्याने तो यशस्वी होतो.
देवापुढे आपण लीन होतो. याचा अर्थ आपल्याला मानसिक आधाराची गरज असते. काही माणसे देव मानत नाहीत. मनुष्य आपल्या मेंदूचा वापर किती आणि कसा करता यावर त्याचे वागणे अवलंबून आहे. मेंदूच्या कुठल्या भागात कशा प्रकारच्या पेशी आणि किती प्रमाणात तयार होतात, त्यातील विद्युत प्रवाह कसे निर्माण होतात यावरही मनुष्याची वर्तणूक अवलंबून आहे. अंधर्शद्घा किंवा र्शद्धा या मानसिक अवस्था असल्यामुळे विज्ञानाचा गाढा अभ्यासकही देवभोळा आणि ज्योतिषाचा सल्ला घेणारा असू शकतो. ज्योतिष शास्त्रावर विविध आरोप केले जातात. हे शास्त्र मनुष्याला दुर्बल बनवते असेही बोलले जाते. काही जणांना आधाराची सवय लागली की ते मग आधार सोडतच नाही. अशा लोकांनी आधार घ्यायचा की नाही त्यांचे त्यांनी ठरविले पाहिजे.पण ज्योतिषशास्त्र हा मानसिक आधार आहे, हे टाळून चालणार नाही.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)