कल्याण : ड्रग्ज माफियांविरोधात वारंवार तक्रार करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला (Attack On Social Worker) केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. मयत समजून ड्रग्ज माफिया पळून गेले. मात्र, सीसीटीव्हीत एक हल्लेखोर कैद झाल्याने या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे. आठ आरोपींपैकी चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अन्य चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे (Attack On Social Worker).
कल्याण डोंबिवलीत असे अनेक परिसर आहे. ज्या ठिकाणी लपूनछपून ड्रग्जचा धंदा केला जातो. तरुण तरुणी ड्रग्जच्या आहारी गेले आहेत. ड्रग्ज माफिया कॉलेज शाळेतील तरुणाई लक्ष्य केले आहे. कल्याण पश्चिमेतील बैलबाजार परिसरात काही वर्षापासून ड्रग्जचा धंदा सुरु असल्याने अनेक वेळा लोक पकडले गेले आहे. कल्याण पोलीस वारंवार कारवाई करत आहेत. मात्र, हा धंदा जास्त फोफावला आहे.
बैल बाजार परिसरात राहणारे आमीर खान यांनी ड्रग्ज माफियांच्या विरोधात आवाज उठवत त्यांची पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. चार वर्षांपूर्वी बैलबाजार परिसरातील कुख्यात ड्रग्ज माफिया रहमत पठाण विरोधात सुद्धा तक्रार अमीर खान याने केले होते. वारंवार आमीर खानकडून केल्या जाणाऱ्या तक्रारीमुळे ड्रग्ज माफियांचा धंदा गोत्यात आला होता. हे सर्व सुरु असताना आमीर रात्रीच्या वेळी घरी परतत असताना घराचा जिना चढत असताना काही अज्ञात लोक त्यांच्या जवळ आले. त्यांच्या तोंडावर कपडा टाकून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या प्राणघातक हल्यात ते बेशूद्ध झाले. त्यांना मयत समजून हल्लेखोर पसार झाले (Attack On Social Worker).
मात्र, परिसरात एका ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीत एक आरोपी कैद झाला. या आरोपीची ओळख पटल्याने पोलिसांना सर्व बाब लक्षात आली. कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नारायण बनकर यांनी पोलीस अधिकारी गणेश कुंभार, दीपक सरोदय पोलीस कर्मचारी विजय भालेराव आणि दीपक सानप यांच्या एक पोलीस पथक तयार करुन तपास सुरु केला. याप्रकरणी आतापर्यंत आरोपी बबन वाणी, इर्शाद शेख, भूषण मोरे आणि संजय सिंग यांना अटक करण्यात आली आहे. अन्य 4 आरोपी रहमत पठाण, छोटे, इश्वर आणि सोनू सिंग यांचा पोलिस शोध घेत आहेत. या या प्रकरणातील इतर आरोपी लवकरात लवकर अटक होणार अशी माहिती कल्याण पवार यांनी दिली आहे. मात्र, या हल्ल्यामुळे पोलिस यंत्रणा खळबळून जागी झाली आहे.
चोरलेल्या रिक्षातच गप्पांचा फड, डोंबिवलीत चोरट्यांना फिल्मी स्टाईल अटकhttps://t.co/hBjsm6QhcE #Dombivali
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 20, 2020
Attack On Social Worker
संबंधित बातम्या :
मटणाच्या दुकानातून चाकू चोरीला, एकाचा खून, चौघे जखमी, बंगळुरुत माथेफिरुला अटक