औरंगाबाद : औरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित महिलेच्या अंत्यविधीला शंभरपेक्षा जास्त जणांची गर्दी जमल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारांना उपस्थित राहिलेल्या सर्वांचा शोध घेण्याची डोकेदुखी प्रशासनाला झाली आहे. (Aurangabad Corona Patient Lady Dies Hundreds of people gathered for Funeral)
औरंगाबादमध्ये 76 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या अंत्यविधीला शंभरपेक्षाही अधिक व्यक्ती उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. संचारबंदी आणि जमावबंदी लागू असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
विशेष म्हणजे महिलेचा मृत्यू झाला, तेव्हा या महिलेचा रिपोर्ट ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आला नव्हता, पण अंत्यविधी झाल्यानंतर रात्री 8 वाजता महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे हे 100 जण कोण होते, हे शोधून काढून त्या सर्वांची कोरोना तपासणी करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. या घटनेने आरोग्य यंत्रणांची झोप उडाली असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोनाबळींचा आकडा पाचवर जाऊन पोहोचला आहे. औरंगाबादमध्ये कोरोनामुळे कालच्या दिवसात दोघांचा मृत्यू झाला. संबंधित महिलेशिवाय 60 वर्षीय पुरुषाने आपला जीव गमावला. दोघांवरही घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते.
औरंगाबादमध्ये कोरोनाबधितांची संख्या 35 वर पोहोचली आहे. सध्या 15 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. औरंगाबाद महापालिकेकडून कॉंटॅक्ट ट्रेसिंग केलं जात आहे.
हेही वाचा : तीन वर्षांचे बाळ ते 92 वर्षीय आजी, पुण्यात 15 जणांच्या कुटुंबाची ‘कोरोना’वर मात
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात सगळीकडे कडकडीत बंद पाळला जात आहे. औषधांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. चौकाचौकात नाकाबंदी कडक करण्यात आली आहे. (Aurangabad Corona Patient Lady Dies Hundreds of people gathered for Funeral)
औरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित बाळंतीणीचे नवजात बाळ ‘कोरोना’ निगेटिव्ह
चार दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित गर्भवतीने जन्म दिलेल्या बाळाला ‘कोरोना’ची लागण झाली नसल्याचं दिलासादायक वृत्त आलं होतं. गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली होती. तिचे नऊ महिने भरत आल्यामुळे महिलेच्या कुटुंबासह डॉक्टर-नर्स यांनाही काळजी लागली होती.
घाटी रुग्णालयात काल (शनिवार 18 एप्रिल) या महिलेची डिलेव्हरी झाली. कोरोनाबाधित महिलेने मुलीला जन्म दिला. बाळाचे ‘कोरोना’ अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे आरोग्य विभागात आनंदाची लाट पसरली. पुढचे काही दिवस बाळाला आईपासून दूर ठेऊन संगोपन केलं जाणार आहे.
VIDEO : Corona | कोल्हापूरमध्ये कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मृत्यू आल्यास 5 लाखांची मदतhttps://t.co/PGCHEIQrAa
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 22, 2020