‘कोरोना’ने आठ दिवसांच्या बाळाचं मातृछत्र हिरावलं

| Updated on: Jun 05, 2020 | 10:57 AM

गेला आठवडाभर तरुणीवर कोरोनाचे उपचार सुरु होते. मात्र किडनी निकामी झाल्याने तिची प्राणज्योत मालवली. (Aurangabad Corona Positive Lady Dies after Giving Birth to baby)

कोरोनाने आठ दिवसांच्या बाळाचं मातृछत्र हिरावलं
Follow us on

औरंगाबाद : ‘कोरोना’मुळे अवघ्या आठ दिवसात नवजात बालकाचे मातृछत्र हिरावल्याचं मन हेलावून सोडणारं वृत्त आहे. औरंगाबादेत कोरोनाबाधित बाळंतीणीचा मृत्यू झाला. सुदैवाने बाळाचा पहिला ‘कोरोना’ रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला. (Aurangabad Corona Positive Lady Dies after Giving Birth to baby)

औरंगाबादमध्ये 30 वर्षीय तरुणीने 28 मे रोजी गोंडस बाळाला जन्म दिला. प्रसुतीच्या दुसऱ्याच कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले. 29 तारखेला बाळंतीण तरुणीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

गेला आठवडाभर तरुणीवर कोरोनाचे उपचार सुरु होते. मात्र किडनी निकामी झाल्याने तिची प्राणज्योत मालवली. अवघ्या आठ दिवसात नवजात अर्भकावर मातृसुखापासून वंचित राहण्याची वेळ ओढवली आहे.

हेही वाचा : जुळ्या बाळांना जन्म देऊन सुखरुप ठेवलं, कोरोनाग्रस्त माऊलीने 24 तासात डोळे मिटले!

दरम्यान, बाळाची कोरोना चाचणी केली असता, पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला. प्रशासनाला दुसऱ्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 59 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1828 झाली आहे. यापैकी 1126 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 93 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या 609 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

अहमदनगरमधील ओल्या बाळंतीणीने जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर 24 तासात जगाचा निरोप घेतल्याची करुण कहाणी गेल्याच आठवड्यात समोर आली होती. (Aurangabad Corona Positive Lady Dies after Giving Birth to baby)

काय झालं ‘त्या’ माऊलीसोबत?

मूळ मुंबईतील चेंबूरची असलेली महिला अहमदनगरमधील निंबळकला गेली होती. त्रास होऊ लागल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ती ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.

महिलेचे 28 मे रोजी सिझेरियन करण्यात आले. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमरास तिने एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्या बाळांना जन्म दिला. दोन्ही बाळांचे वजन 2 किलो इतके भरले. त्यामुळे कुटुंबासह आरोग्य यंत्रणेत आनंदाची लकेर उमटली होती. मात्र शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता महिलेची प्राणज्योत मालवल्याची चटका लावणारी बातमी आली आणि सर्वच हळहळले.