औरंगाबाद : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 12 हजार 974 वर पोहोचला (Aurangabad Corona Virus Patient) आहे. मुंबई, पुण्यासह औरंगाबादमध्येही कोरोना रुग्णांचा आकडा धक्कादायकरित्या वाढत चालला आहे. औरंगाबादेत एका रात्रीत 47 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 300 च्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत चालले (Aurangabad Corona Virus Patient) आहेत. औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा काल (3 मे) 244 इतका होता. त्यानंतर एका रात्रीत 47 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 291 वर पोहोचला आहे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लड्डा यांनी याबाबतची माहिती दिली.
तर मध्यरात्रीच्या सुमारास एका 55 वर्षीय कोरोनाबधित व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे औरंगाबादमध्ये कोरोनाबळींची संख्या 10 वर पोहोचली आहे.
औरंगाबादेतील चार दिवसातील रुग्णांची वाढ
तारीख – रुग्ण
औरंगाबादेत 1 मे रोजी 39 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 2 मे रोजी औरंगाबादेत आणखी 23 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर काल (3 मे) कोरोनाचे आणखी 17 रुग्ण वाढले आहेत. तर आज (4 मे) 47 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसात जवळपास 126 रुग्ण वाढले आहेत.
दरम्यान औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा अलर्टवर आला (Aurangabad Corona Virus Patient) आहे.
संबंधित बातम्या :
औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, आणखी 17 जण पॉझिटिव्ह