औरंगाबाद : महाराष्ट्रात कोरोनाबळींची संख्या दिवसेंदिवस वाढत (Aurangabad Corporator Nitin Salve Died Due to Corona) आहे. औरंगाबादमध्ये कोरोनामुळे एका नगरसेवकाचा मृत्यू झाला आहे. नितीन साळवे असे या नगरसेवकाचे नाव आहे. नितीन साळवे हे शिवसेनेचे नगरसेवक होते. दरम्यान आतापर्यंत चार नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
औरंगाबादेतील शिवसेनेचे नगरसेवक नितीन साळवे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या सात दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते औरंगाबादच्या बालाजी नगर वार्डातून शिवसेनेचे नगरसेवक होते.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
गेल्या काही दिवसांपासून स्थानिक नगरसेवक, आमदार, मंत्री यासारख्या लोकप्रतिनिधींना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत राष्ट्रवादीच्या दोन आणि शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नगरसेवकांची नावे
दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे 4 जुलै रोजी कोरोनानमुळे निधन झाले. साने यांच्या निधनानंतर आज (7 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पिंपरी चिंचवड येथे साने यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी पोहोचले. यावेळी शरद पवार यांनी दत्ता साने यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन (Aurangabad Corporator Nitin Salve Died Due to Corona) केले.
BJP MLA Rahul Kool Corona | दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना ‘कोरोना’ची लागण https://t.co/Tx50iiSZRE #RahulKool
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 7, 2020
संबंधित बातम्या :
कोरोनामुळे निधन झालेल्या नगरसेवकाच्या घरी शरद पवार, कुटुंबियांचं सांत्वन
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन, बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह