औरंगाबाद : औरंगाबादेत एमजीएम रुग्णालयात कोरोना निगेटिव्ह रुग्णाला (Aurangabad MGM Hospital) पॉझिटिव्ह दाखवून त्याच्यावर कोरोना उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. पण, रुग्णालयाने केलेल्या हलगर्जीपणामुळे एमजीएम रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. याप्रकरणी डॉक्टरांवर आणि रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. (Aurangabad MGM Hospital).
एमजीएम रुग्णालय हे औरंगाबाद शहरातील सर्वात मोठं रुग्णालय आहे. कोरोना आजाराच्या साथीला सुरवात झाल्यापासून या रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आतापर्यंत या रुग्णालयाने हजारो रुग्णांवर उपचार केले आहेत. पण कालपासून हे रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. एका 70 वर्षीय कोरोना निगेटिव्ह रुग्णाला पॉझिटिव्ह दाखवून कोरोना उपचार केल्याचा आरोप रुग्णालयावर करण्यात आला आहे.
औरंगाबाद जवळच्या तिसगाव या गावातील प्रभुलाल जैस्वाल या 70 वर्षीय व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची अँटिजेन टेस्ट ही निगेटिव्ह आली होती. पण, तरीही एक्सरेचा हवाला देऊन रुग्णालयाने हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं आणि कोरोना आयसीयू विभागात उपचार सुरु केले. पण त्यानंतर दोनच तासात रुग्णाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप केला आणि रुग्णालयावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
आता या प्रकरणात रुग्णालयाकडून घडलेल्या प्रकारचं समर्थन केलं जात आहे. तो रुग्ण कोरोना संशयित होता आणि आमची यात कुठलीही चूक झालेली नाही, असा दावा रुग्णालय करत आहे. पण कोरोना निगेटिव्ह असलेल्या रुग्णाला पॉझिटिव्ह वॉर्डात नेलंच कशासाठी, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
वडिलांचा कोरोनाने मृत्यू, बातमी कळताच काही तासातच कोरोनाग्रस्त मुलाला हार्ट अटॅकhttps://t.co/1oSmRFzGsD#NaviMumbai
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 20, 2020
Aurangabad MGM Hospital
संबंधित बातम्या :
Navi Mumbai | डॉक्टरांनी वापरलेल्या ग्लोव्ह्जची धुवून पुन्हा विक्री, 263 गोण्या जप्त
श्वसनासंबंधी 20 आजारांसाठी मोफत उपचार, शुल्क आकारल्यास हॉस्पिटलला पाचपट दंड, राजेश टोपेंच्या सूचना