औरंगाबाद : एकिकडे कोरोना विषाणूच्या संसर्गाची लाट थोपवण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी अविरतपणे परिश्रम घेत आहेत. तर दुसरीकडे याच कोरोना योद्ध्यांना आपल्या थकीत वेतनासाठी आता संपावर जाण्याची वेळ आली आहे. औरंगाबादमधील निवासी डॉक्टरांनी दोन महिन्यांपासून वेतन थकल्याने अखेर संपावर जाण्याचा इशारा दिला आहे (Aurangabad residential doctor protest warning). यासाठी त्यांनी सरकारला 15 ऑगस्टपर्यंत वेतन देण्याचा अल्टिमेटमही दिला आहे.
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रिसिडन्ट डॉक्टरने औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना याबाबत पत्र दिलं आहे. यात म्हटलं आहे, “आम्ही सर्व निवास डॉक्टर मागील 5 महिन्यांपासून कोव्हिड 19 या जागतिक महामारीमध्ये ड्युटी करत आहोत. मागील 2 महिन्यांपासून आम्ही निवासी डॉक्टरांचे वेतन रखडलेले आहे. याबाबत अधिष्ठातांना पत्र पूर्वीच दिले आहे. रुग्णांची सेवा हीच आमची प्राथमिकता आणि ध्येय आहे. त्यांची गैरसोय होणार नाही. मात्र, 15 ऑगस्टपर्यंत विद्यावेतन जमा न झाल्यास आम्ही संपावर जाऊ याची नोंद घ्यावी.”
औरंगाबाद पालिकेच्या 7 कर्मचाऱ्यांना नोटीस, कामात हलगर्जीपणा केल्याने आयुक्तांची कारवाई
दरम्यान, औरंगाबादमध्ये प्लाझ्मा थेरेपीचा पहिलाच प्रयोग झाला आहे. कोरोना बाधित अत्यवस्थ रुग्णावर हा प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग करण्यात आला. या रुग्णाचं वय 42 वर्ष आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हे उपचार करण्यात आले. आता 48 तासानंतर प्लाझ्मा थेरपीचे परिणाम स्पष्ट होणार आहेत.
संबंधित बातम्या :
Aurangabad Sero Survey | औरंगाबादेतही सेरो सर्व्हे, 10 हजार नागरिकांच्या टेस्ट होणार
औरंगाबादेत कोरोनाग्रस्त 90 वर्षीय आजीला जंगलात सोडलं, निर्दयी नातेवाईक पसार, गुन्हा दाखल
संबंधित व्हिडीओ :
Aurangabad residential doctor protest warning