औरंगाबादः भाजपच्या दोन मंत्र्यांच्या गावात पेटलेला पीटलाइनचा वाद आणखीच चिघळत चालला आहे. सुरुवातीला रेल्वेची पीटलाइन औरंगाबादमध्ये होण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी चिकलठाणा येथे जमीन उपलब्धही करून देण्यात आली होती. मात्र अचानक केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जालना येथे पीटलाइन होण्याची घोषणा केली आणि पाहता पाहता त्यासाठी जमीन उपलब्ध करून देऊन त्यासाठीच्या निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या. रेल्वेच्या पीटलाइन (Railway Pitline) ज्या स्टेशनवर होणार, त्या शहराचा, जिल्ह्याचा संपर्क राज्यातील इतर जिल्ह्यांशी वाढणार आणि पर्यायाने विकासाच्या कक्षा रुंदावणार. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात पीटलाइन व्हावी, यासाठी जालना आणि औरंगाबाद असे दोन्ही जिल्हे आक्रमक होते. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार यांनी दोन्ही ठिकाणी पीटलाइन होण्याचे आश्वासन दिले असले तरीही औरंगाबादकरांची निराशा होणार असे दिसत आहे. जालन्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुढाकार घेतला आणि जालन्याच्या पीटलाइनला गती मिळाली. मात्र औरंगबादेतल्या पीटलाइनसाठी काहीही हालचाली दिसत नसल्याने रेल्वे संघटनांकडून संताप व्यक्त होत आहे.
औरंगाबादेतील चिकलठाणा येथे पटलाइन करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र जागा अपुरी असल्याचे कारण दाखवत पीटलाइन जालन्यात करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतल्याची माहिती एका पत्राद्वारे समोर आली आहे. त्यामुळे औरंगाबादेत पीटलाइनसाठी जागा नसल्याचा खटाटोप केला जात असल्याची ओरड रेल्वे संघटानांकडून होत आहे. सध्या एक पीटलाइनची जागा उपलब्ध आहे, त्यानंतर आवश्यक असलेली जागा शेतकीर देण्यास तयार आहेत. रेल्वेने ही जागा घेतली पाहिजे, औरंगाबादच पीटलाइन लवकरात लवकर होण्यास गती दिली पाहिजे, अशी मागणी मराठवाडा रेल्वे कृत समितीचे अध्यक्ष, अनंत बोरकर यांनी केली आहे.
इकडे औरंगाबादच्या पीटलाइनचा प्रस्ताव बारगळण्याची चिन्ह दिसतानाच तिकडे जालन्याच्या पीटलाइनच्या कामांना गती मिळाल्याचे दिसत आहे. जालन्यात कोच, देखभाल सुविधेच्या विकासासह प्राथमिक विद्युत कामे, विद्युत युनिटचे स्थलांतर आदी कामांसाठी काही दिवसांपूर्वीच निविदा प्रसिद्ध झाली आहे. जालन्यात पीटलाइन होण्यासाठी रेल्वेची यंत्रणा व्यस्त झाली आहे.
औरंगाबादेत रेल्वे स्टेशनव रल उपयोगात नसलेली जुन पीटलाइन दुरुस्त करून त्याचा विस्तार करणे आणि उपयोगात आणणे शक्य आहे. आयओएच शेड आणि इतर सुविधा जालन्याला होणार असल्याने त्या सुविधा औरंगाबादला नाही दिल्या तरी जालतील, केवळ पीटलाइन पुरेशी आहे, असे रेल्वे संघटना आणि रेल्वे अभ्यासकांचे मत आहे.
इतर बातम्या-