औरंगाबाद : सिडको परिसरातील एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Aurangabad teacher show obscene video) आहे. या प्रकरणी संतप्त पालकांनी शाळेत गोंधळ घालत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणी संस्था आणि मुख्याध्यापक संबंधित शिक्षकास पाठीशी घालत असल्याचा आरोपही पालकांनी केला आहे.
औरंगाबदमध्ये सिडको शहरातील शाळेत सातवीत शिकणाऱ्या एका मुलीला शिक्षकानेच अश्लील व्हिडीओ दाखवल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी संबंधित विद्यार्थिनीने दामिनी पथकाकडे पत्र लिहून तक्रार केली. तसेच महिला आयोगाकडेही पीडित विद्यार्थिनीने धाव घेत कारवाईची मागणी केली.
मात्र शाळेकडून त्या शिक्षकाला सकाळच्या सत्रातून काढले. त्यानंतर त्या शिक्षकाला दुपारच्या सत्रात प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्याची अंतर्गत बदली करण्यात आली. याप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त पालकांनी त्या शिक्षकावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे. मात्र शाळा प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने पालक आणि शिक्षकांमध्ये वाद (Aurangabad teacher show obscene video) झाला.
यानंतर पालकांनी संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करावा यासाठी सिडको पोलीस ठाण्यात गर्दी केली. त्या शिक्षकांवर कारवाई करावी, अशीही मागणी पालकांनी केली आहे.
दरम्यान ही घटना पोलीस ठाण्यात गेल्यानंतर संबंधित शिक्षक पसार झाला आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जर या शिक्षकावर कारवाई झाली नाही, तर शाळेला कुलूप लावू अशा इशारा संतप्त पालकांनी दिला (Aurangabad teacher show obscene video) आहे.