औरंगाबाद : अनलॉक-2 मध्ये औरंगाबाद शहर (Aurangabad Unlock-2 Rules) आणि जिल्ह्याला वेगवेगळे नियम लागू असतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबादेतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालिका आयुक्तांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद पालिका आयुक्त अस्तिकुमार पांडे, कलेक्टर उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली (Aurangabad Unlock-2 Rules).
औरंगाबाद एमआयडीसीत 8 दिवसांचा कर्फ्यू
औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी 8 दिवसांच्या कर्फ्यूची घोषणा केली आहे. औरंगाबाद एमआयडीसीतील नागरी वसाहतीत 8 दिवस कडकडीत बंद राहणार आहे. कोरोना नियंत्रणात आला नाही, तर औरंगाबाद शहरातही कर्फ्यू लावणार, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी-आयुक्तांच्या निर्णयानुसार शहर आणि जिल्ह्याला वेगवेगळे नियम लागू राहतील. ते नियम काय?
Aurangabad Unlock-2 Rules
औरंगाबादेत कोरोनाचे रुग्ण
औरंगाबादेत सध्या कोरोनाचे 4 हजार 833 रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 222 जणांनी कोरोनावर मात केली आहे. औरंगाबादेत आतापर्यंत 227 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Lockdown Extension | कन्फ्युजन नको, 31 जुलैपर्यंत वाढवलेल्या लॉकडाऊनबद्दल सर्व काही https://t.co/ZivtHvDhUX #lockdownextension #lockdown #maharashtralockdown @CMOMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 29, 2020
Aurangabad Unlock-2 Rules
संंबंधित बातम्या :
Lockdown | लॉकडाऊन वाढवल्यानंतर टप्प्याटप्याने शिथीलता, राज्यात काय सुरु, काय बंद?
Maharashtra Lockdown Extension | महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला
Thane Lockdown Extension | ठाण्यात 2 जुलैपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन