सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 3rd Test) यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित झाला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 407 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाला पाचव्या दिवसखेर 5 विकेट्स गमावून 334 धावाच करता आल्या. हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन या जोडीने झुंजार खेळी केली. या दोघांनी मैदानात टिकून कांगारुंच्या भेदक माऱ्याचा सामना केला. विहारीने 161 चेंडूत नाबाद 23 धावा केल्या. तर रवीचंद्रन अश्विननेही 128 चेंडूत 39 धावांची खेळी केली. हा सामान अनिर्णित राहिल्याने मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. (australia vs india 2020 21 3rd test day 5 live cricket score updates online in marathi at sydney cricket ground)
टीम इंडियाकडून रिषभ पंतने सर्वाधिक 97 धावांची खेळी केली. तर चेतेश्वर पुजाराने झुंजार 77 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड आणि नॅथन लायनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्सने 1 विकेट मिळवला. टीम इंडियाला विजयाची नामी संधी होती. मात्र रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा बाद झाले. यानंतर सामना ड्रॉच्या दिशेने गेला.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला चौथ्या दिवशी विजयासाठी 407 धावांचे तगडे आव्हान दिले होते. या विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाची आश्वासक सुरुवात झाली. शुबमन गिल आणि रोहित शर्मा या जोडीने 71 धावांची सलामी भागीदारी केली. यानंतर शुबमन गिल 31 धावांवर बाद झाला.
यानंतर चेतेश्वर पुजारासह रोहितने स्कोअरकार्ड हलता ठेवला. यादरम्यान रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केलं. मात्र यानंतर रोहित शर्मा 52 धावावंर बाद झाला. रोहितनंतर कर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात आला. चौथ्या दिवसखेर टीम इंडियाने 2 विकेट्स गमावून 98 धावा केल्या होत्या.
पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला. भारताला विजयासाठी 309 धावांची आवश्यकता होती. पुजारा-रहाणे अनुभवी जोडी मैदानात होती. मात्र रहाणेला विशेष काही करता आले नाही. टीम इंडियाचा 102 स्कोअर असताना रहाणे आऊट झाला. रहाणेने अवघ्या 4 धावा केल्या.
रहाणे बाद झाल्यानंतर रिषभ पंत मैदानात आला. पंतने आधी सावध खेळी केली. मात्र त्यानंतर त्याने आक्रमकतेने खेळी करायला सुरुवात केली. एकाबाजूला पुजारा सावधपणे खेळत होता. तर दुसऱ्या बाजूला पंत फटकेबाजी करत होता. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागादारी पूर्ण केली. या दोघांच्या आश्वासक खेळीमुळे टीम इंडियाच्या विजयाच्या आशा वाढल्या.
पंत आणखी आक्रमतेने खेळू लागला. या दोघांमध्ये चांगली भागीदारी रंगली होती. ही जोडी टीम इंडियासाठी विजयाचा मार्ग सुकर करत होती. त्यामुळे ही जोडी ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरल होती.
मात्र ही जोडी तोडायला अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनला यश आले. रिषभ पंत नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. पंतला शतकासाठी अवघ्या 3 धावांची आवश्यकता होती. मात्र फटक मारण्याच्या नादात पंत कॅच आऊट झाला. पंतने 118 चेंडूत 12 चौकार आणि 3 सिक्ससह शानदार 97 धावा केल्या.
पंत बाद झाल्यानंतर हनुमा विहारी मैदानात आला. पुजाराने काही षटकं विहारीसोबत खेळल्या. पुजारा मैदानात चांगला सेट झाला होता. त्यामुळे पुजाराकडून टीम इंडियाला अपेक्षा होत्या. मात्र पुजारा जोश हेझलवूडचा शिकार ठरला. हेझलवूडने पुजाराला बोल्ड केलं.पुजाराने 205 चेंडूत 77 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 12 चौकार लगावले.
पुजारानंतर अश्विन मैदानात आला. अश्विन आणि विहारीने सामना ड्रॉ करण्याच्या उद्देशाने खेळ केला. या दोघांनी कांगारुंच्या गोलंदाजांचा सामना केला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोघांनी कांगारुंना बॅटने जशास तसे चोख उत्तर दिले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. अश्विनने 128 चेंडूत नाबाद 39 तर विहारीने 161 चेंडूत 23 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 338 धावा केल्या. तर टीम इंडियाचा पहिला डावा 244 धावांवर गुंडाळला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 94 धावांची आघाडी मिळाली. या 94 धावांच्या आघाडीसह कांगारुंनी दुसऱ्या डावात आणखी 312 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कॅमरॉन ग्रीनने सर्वाधिक 84 धावा केल्या. तर स्टीव्ह स्मिथने 81 धावांची खेळी केली. तर मार्नस लाबुशेनने 73 धावा केल्या. कांगारुंनी दुसरा डाव 312-6 धावसंख्या असताना डाव घोषित केला.यामुळे ऑस्ट्रेलियाला 407 धावांचे तगडे आव्हान मिळाले.
टीम इंडियाने पहिल्या डावात एकूण 244 धावा केल्या. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. शुभमन गिल आणि रोहित शर्माने टीम इंडियाला आश्वासक सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी 70 धावांची आश्वासक भागीदारी केली. मात्र यानंतर टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. टीम इंडियाकडून शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने अर्धशतकी खेळी केली. तर रिषभ पंतनेही 36 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर जोश हेझलवूडने 2 विकेट घेत पॅटला चांगली साथ दिली. तसेच मिचेल स्टार्कला 1 विकेट मिळवला.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कांगारुंनी पहिल्या डावातील सुरुवात निराशाजनक झाली. कांगारुंनी पहिला विकेट लवकर गमावला. मात्र यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करण्यात आली. या दोन शतकी भागीदारीच्या जोरावर कांगारूंनी पहिल्या डावात 338 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथने 131 धावांची शतकी खेळी केली. तर मार्नस लाबुशेनने 91 धावा केल्या. तसेच पदार्पण केलेल्या विल पुकोव्हसकीने 62 धावांची शानदार खेळी केली. टीम इंडियाकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर नवदीप सैनी आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या. मोहम्मद सिराजनेही 1 विकेट घेतला.
दरम्यान या मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना 15 जानेवारीला ब्रिस्बेनमध्ये खेळण्यात येणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Aus vs Ind 3rd Test) यांच्यातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित झाला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 407 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाला पाचव्या दिवसखेर 5 विकेट्स गमावून 334 धावाच करता आल्या.
हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन या जोडीने झुंजार खेळी केली. या दोघांनी मैदानात टिकून कांगारुंच्या भेदक माऱ्याचा सामना केला. विहारीने 161 चेंडूत 23 धावा केल्या. तर रवीचंद्रन अश्विनने 39 धावांची खेळी केली.
टीम इंडियाकडून रिषभ पंतने सर्वाधिक 97 धावांची खेळी केली. तर चेतेश्वर पुजाराने झुंजार 77 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड आणि नॅथन लायनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्सने 1 विकेट मिळवला.
टीम इंडियाच्या 300 धावा पूर्ण झाल्या आहेत. टीम इंडियाला विजयासाठी आणखी 107 धावांची आवश्यकता आहे. मात्र हा सामना अनिर्णित होणार असल्याचं दिसून येत आहे.
चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत बाद झाल्यानंतर भारताच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील विजयाच्या आशा मंदावल्या आहेत. दुखापतग्रस्त हनुमा विहारीचा संघर्ष सुरु आहे. रवीचंद्रन अश्विन त्याची साथ देण्यासाठी मैदानात उतरला आहे. परंतु ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना जखडून ठेवलं आहे. भारताने आतापर्यंत 5 बाद 280 धावा जमवल्या आहेत. अद्याप विजयासाठी टीम इंडियाला 127 धावांची आवश्यकता आहे.
भारताच्या विजयाच्या आशा आता मंदावू लागल्या आहेत. आक्रमक फलंदाज ऋषभ पंत बाद झाल्यानंतर भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारादेखील बाद झाला आहे. पुजाराने 205 चेंडूत 77 धावा केल्या. यादरम्यान त्याने 12 चौकार फटकावले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पॅट कमिंसने आतापर्यंत चेतेश्वर पुजाराला जखडून ठेवले होते. तीन कसोटी सामन्यांमध्ये पुजाराला चार वेळा कमिंसने बाद केलं आहे. तसेच पुजारा कमिंसविरोधात धावादेखील जमवू शकत नव्हता. परंतु आज ऋषभ पंत बाद झाल्यानंतर पुजारा आक्रमक झाला आहे. त्याने थेट पॅट कमिंसवर हल्ला चढवला आहे. भारताच्या दुसऱ्या डावातील 83 व्या षटकात पुजाराने सुरुवातीच्या तीन चेंडूवर लागोपाठ तीन चौकार फटकावून कमिंसला बॅटफुटवर ढकलले आहे.
विस्फोटक फलंदाज ऋषभ पंत 97 धावांवर बाद झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघ बॅकफुटवर ढकला गेला आहे. पंतने 118 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 97 धावा फटकावल्या. भारताच्या 250 धावा फलकावर लागल्या आहेत. संघाला विजयासाठी अद्याप 197 धावांची आवश्यकता आहे.
कठीण परिस्थितीत भारताने 250 धावांचा टप्पा पार केला आहे. पंत-पुजाराच्या जोडीने शतकी भागिदारी करत भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. भारताला विजयासाठी अद्याप 157 धावांची आवश्यकता आहे.
ऋषभ पंतपाठोपाठ चेतेश्वर पुजारनेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरं तर आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट कारकीर्दीतीलं 26 वं अर्धशतक (170 चेंडूत 52 धावा) झळकावलं आहे. दरम्यान पुजाराने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट कारकीर्दीतील 6 हजार धावा पूर्ण आहेत.
आजच्या दिवसातील दुसऱ्या सत्रात मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर एक चोरटी धाव घेत भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट कारकीर्दीतील 6 हजार धावा पूर्ण आहेत. पुजारा सध्या 46 धावांवर खेळत त्याची अर्धशतकाकडे वाटचाल सुरु आहे.
लंचनंतर आजच्या दिवसातील सामन्याच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने चेंडू जलदगती गोलंदाजांच्या हाती सोपवला आहे. या सत्रात कांगारु आक्रमणाच्या हेतूने मैदानात उतरले आहेत.
ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा या जोडीने अत्यंत बिकट परिस्थितीत शतकी भागिदारी रचल्यामुळे भारताला 3 गड्यांच्या बदल्यात 206 धावा फलकावर लावण्यात यश मिळालं आहे. त्यामुळे संघाला आता विजयासाठी 201 धावांची आवश्यकता आहे. पंत 73 आणि पुजारा 41 धावांवर खेळत आहेत
अत्यंत बिकट अवस्थेत असलेल्या टीम इंडियाचं धावफलकावर द्विशतक झळकावण्यात ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराच्या जोडीला यश मिळालं आहे. या दोघांनी आतापर्यंत 199 चेंडूत 100 धावांची भागिदारी रचली आहे. भारत अद्याप विजयापासून 205 धावा दूर आहे. पंत 73 आणि पुजारा 37 धावांवर खेळत आहेत.
कालच्या 2 बाद 98 धावांवरुन आज सकाळी सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात वाईट झाली. 407 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे (4) सकाळी लवकर बाद झाला. रहाणेची विकेट गमावल्यानंतर बॅकफुटवर गेलेल्या टीम इंडियाचा डाव यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी सावरला आहे. ऋषभ पंतने झटपट अर्धशतक पूर्ण करुन विजयाचे मनसुबे सिद्ध केले आहेत. पंतने आतापर्यंत 79 चेंडूत 63 धावांवर खेळत आहे. आतापर्यंत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले आहेत. भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा 29 धावांवर नाबाद आहे.