मुंबई : विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर (automobile industry festive season) होंडा या कार कंपनीने काही ऑफर्स (Honda Offers) दिल्या आहेत. विशेष म्हणजे होंडा (Honda) च्या काही गाड्यांवर 4 लाखांपर्यंत सूट देण्यात येत आहे. यासोबत जुन्या गाड्यांच्या एक्सचेंजवर अतिरिक्त डिस्काऊंट (Honda Exchange Offer) देण्यात येत आहे. नुकतंच कंपनीने (Honda) काही गाड्यांवर ऑफर्स दिल्या आहे. या ऑफर्स 30 सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे.
Honda Amaze :
होंडाच्या या गाडीवर जवळपास 42 हजारांची सूट देण्यात येणार आहे. कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, Honda Amaze ची नवीन गाडी खरेदी केल्यास त्यावर 12 हजार रुपयांची अतिरिक्त वॉरंटी (Extended Warranty) मिळणार आहे. त्याशिवाय तीन वर्षांपर्यंत 16 हजार रुपयांचे होंडा केअर मेंटेनेंसही यासोबत दिला जाणार आहे.
तर दुसरीकडे Honda Amaze ही गाडी एक्सचेंज केल्यानंतर 12 हजार रुपयांची एक्सटेंडेड वॉरंटी मिळणार आहे. यासोबतच 30 हजारांपर्यंत अतिरिक्त सूटही दिली जाणार आहे. पण ACE अॅडिशनवर ही ऑफर्स लागू होणार नाही. त्यासाठी काही वेगळ्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत.
Honda Jazz :
या गाडीवर 25 हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट मिळणार आहे. तर जुनी गाडी एक्सचेंज केल्यानंतर काही अटींवर 25 हजारांची अतिरिक्त सूट मिळू शकते.
Honda WR-V :
होंडाच्या या गाडीवर 25 हजारांचा कॅश डिस्काऊंट दिला जात आहे. तर एक्सचेंज ऑफर्सवर 20 हजारांची अतिरिक्त सूट मिळणार आहे.
Honda City :
या गाडीवर जवळपास 30 हजारांचा कॅश डिस्काऊंट देण्यात येत आहे. तर एक्सचेंज ऑफरवर 32 हजारांची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.
Honda BR-V :
या गाडीवर तुम्हाला 1 लाख 10 हजारांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. तर जुन्या गाडीच्या एक्सचेंजवर नवीन BR-V खरेदी करण्यावर 33 हजार 500 रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काऊंट, 50 हजारांचा अतिरिक्त डिस्काऊंट आणि 26 हजार 500 रुपयांचे काही सामान देण्यात येणार आहे.
Honda Civic :
ही गाडी खरेदी करण्यासाठी 2 लाख 50 हजारापर्यंतचा कॅश डिस्काऊंट दिला जात आहे. मात्र याबाबत काही अटी लागू करण्यात आल्या आहेत.
Honda CR-V :
या गाडीवर तब्बल 4 लाखांची सूट दिली जाणार आहे. मात्र यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. होंडाच्या या सर्व ऑफर्स विविध ठिकाण आणि वेरिएंटच्या तुलनेत विविध असू शकतात. यासारख्या विविध ऑफर्स किंवा माहितीसाठी https://www.hondacarindia.com/offers या लिंकवर भेट द्या.